चायनीज चिकन सलाड
ड्रेसिंगचे साहित्य: १ मोठा चमचा तिळाचे तेल, १ मोठा चमचा अॅपल साइडर व्हिनेगर/व्हाइट व्हिनेगर, १ मोठा चमचा मस्टर्ड सॉस, १ मोठा चमचा हॉट सॉस/चिली सॉस, १ मोठा चमचा मध, किसलेल्या २ लसूण पाकळ्या.
सलाडसाठी साहित्य: (सर्व भाज्या बारीक लांब काप करून घेणे) १ वाटी चायनीज कोबी (अथवा साधा कोबी), १ वाटी जांभळा कोबी, अर्धे गाजर, अर्धी लाल ढोबळी मिरची, पाव कप पातीचा कांदा, थोडी चिरलेली कोथिंबीर, १ कप शिजलेले चिकनचे तुकडे.
कृती: ड्रेसिंगचे सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडरमध्ये वाटून घ्या. सलाडच्या भाज्या एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यावर ड्रेसिंग घालून अलगद एकजीव करून घ्या आणि सर्व्ह करा.
टीप: यात चिकनऐवजी पनीर किंवा तळलेली कुरडई घालू शकता.
अमिता गद्रे