वॉलडॉर्फ सलाड
न्यूयॉर्क सिटीमधील वॉलडॉर्फ हॉटेलमध्ये हे सलाड पहिल्यांदा बनवले गेले. या हॉटेलच्या नावावरूनच रेसिपीचे नाव वॉलडॉर्फ सलाड असे पडले आहे.
साहित्य: १ सफरचंद, १०० ग्रॅम पनीर/टोफू (चौकोनी काप करून घेणे), १ मोठी तुकडे केलेली काकडी, १ छोटी वाटी अक्रोडचे तुकडे, १/२कप घट्ट दही, २ छोटे चमचे ऑलिव्ह तेल/साधे तेल, १/४कप कोथिंबीर, चवीनुसार मीठ व मिरपूड.
कृती: एका बाऊलमध्ये चिरलेले सफरचंद, काकडी व अक्रोड घालून एकत्र करा. त्यात पनीर/टोफू घाला. ड्रेसिंगसाठी दही आणि तेल घालून एकत्र फेटा. त्यात चवीनुसार मीठ, मिरपूड व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
टीप: सफरचंदाऐवजी तुम्ही पेर किंवा स्टारफ्रूटही वापरू शकता.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अमिता गद्रे