स्प्राऊट्स सलाड
स्प्राऊट्स सलाड ही एक स्वादिष्ट आणि पौष्टिक डिश आहे. चाट/भेळ खावीशी वाटल्यास ह्याच सलाडमध्ये थोडे चुरमुरे घालून खावे.
साहित्य: १ कप वाफवलेले स्प्राऊट्स (मोड आलेली कोणतीही कडधान्ये), २ मोठे चमचे दही, ५० ग्रॅम किंवा एक छोटेसे उकडलेले रताळे, १ लहान चिरलेला कांदा, १ लहान चिरलेली काकडी, चिरलेली अर्धी हिरवी मिरची, १/४ वाटी चिरलेली कोथिंबीर, १/४ मोठा चमचा चाट मसाला, १/४ मोठा चमचा शेंदेलोण (खडे मीठ), १/४ मोठा चमचा लाल मिरची पावडर, २ छोटे चमचे पुदिना-कोथिंबीर चटणी, २ छोटे चमचे चिंचगुळाची चटणी, २ मोठे चमचे खारे शेंगदाणे.
कृती: एका बाऊलमध्ये चाट मसाला, खडे मीठ, लाल मिरची पावडर, पुदिना-कोथिंबीर चटणी, चिंचगुळाची चटणी घालून चांगले एकजीव करून घ्या. त्यात कडधान्ये, रताळे, कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर आणि दही घालून एकजीव करून सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अमिता गद्रे