रताळ्याचे मोदक
साहित्य: १ वाटी उकडून स्मॅश केलेले रताळे, १/२ वाटी खवा, १/२ वाटी साखर, १/२ वाटी दूध, १/४ वाटी डेसीकेटेड कोकोनट, १/४ वाटी मिल्क पावडर, १/४ वाटी तूप, जायफळपूड, वेलचीपूड, ड्रायफ्रूट्स्.
कृती: प्रथम कुकरमध्ये पाणी न घालता रताळी उकडून घ्या. उकडलेली रताळी थंड झाल्यावर कुस्करून घ्या. कढईमध्ये १/२ वाटी खवा परतून बाजूला काढून ठेवा. आता कढईमध्ये तूप घाला. ते गरम झाल्यावर कुस्करलेली रताळी मंद आचेवर तुपामध्ये परतवून घ्या. नंतर एका भांड्यात दूध घेऊन त्यात मिल्क पावडर मिक्स करावी व त्यामध्ये रताळी, डेसीकेटेड कोकोनट, साखर हे सर्व साहित्य मंद आचेवर छान परतवून घ्या. शेवटी खवा, ड्रायफ्रूट्स, जायफळ-वेचलीपूड घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. त्याचा घट्ट गोळा तयार झाल्यावर तो थंड होऊ द्या. नंतर मोदक पात्रात घालून त्याला मोदकाचा आकार द्या.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सुनिता बुद्धिवंत, भाईंदर