यम्मी कंदमुळे बास्केट
साहित्य: ५ बटाटे, प्रत्येकी १ गाजर, बीट, अरवी, रताळे (७-८ फोडी होतील असा तुकडा), जांभळा कंद, ११/२ कप दूध, ११/२ मोठा चमचा मैदा / कणिक, २-३ मोठे चमचे बटर, २ चीज ञ्चयुब, १/२ छोटा चमचा मिरी पावडर, २-३ मोठे चमचे ब्रुशेटा सिझनिंग किंवा ओरेगॅनो, १ छोटा चमचा चिली क्रलेञ्चस, १/२ मोठा चमचा हिरवी मिरची व लसूण पेस्ट, १ मिरची व ४-५ लसूण पाकळ्या, २-३ मोठे चमचे कॉर्नक्रलोअर, २-३ छोटे चमचे बटर, १ छोटा चमचा ड्राय बेसिल.
कृती: बटाट्यांची साले काढून जाड कीस पडेल अशा किसणीवर किसा. मग तो कीस चाळणीवर घेऊन पाण्याने स्वच्छ धुऊन निथळून घ्या व घट्ट पिळून पाणी पूर्ण काढून एका मिञ्चिसंग बाऊलमध्ये घ्या. त्यात एक ते दीड छोटा चमचा बटर, कॉर्नक्रलोअर, ब्रुशेटा सिझनिंग किंवा ओरेगॅनो व किंचित मीठ घालून मिञ्चस करा.आता केक मोल्डस्ला बटरचा हात लावून घ्या. त्यात अडीच मोठे चमचे हे मिश्रण घालून ते बास्केट होईल असे त्यात पसरा (मध्ये वाटीसारखे खोलगट करून) व प्रिहिटेड ओव्हनमध्ये १८०० वर पंचवीस ते तीस मिनिटे बेक करा. अशा बास्केटस् आधी करून घ्या.
गाजर सोडून बाकीची कंदमुळे कुकरमध्ये वाफवून घ्या. तर गाजराचे लहान-लहान तुकडे पाण्यात पाच-सहा मिनिटे उकळवून घ्या. वाफवलेले बीट, रताळे, अरवी व गाजर थंड झाल्यावर लहान तुकडे करा व त्यावर किंचित मीठ, सिझनिंग, मिरपूड शिंपडा व पुसटसा बटरचा हात लावून ठेवा.
मग एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्यावर मिरची-लसूण पेस्ट, मैदा घालून शेका. मैद्याचा रंग बदलू नये. मग हळूहळू दूध घालून मिश्रण दाटसर झाले की मिरपूड, ब्रुशेटा सिझनिंग, एक चीज ञ्चयुब किसून घाला. आता यात अर्धा छोटा चमचा ड्राय बेसिल व सर्व वाफवलेल्या कंदमुळांचे मॅरिनेट केलेले तुकडे घाला. मात्र बीटाचे तुकडे मिसळू नका, त्याने ह्या सॉसचा रंग बदलतो. सर्व्ह करताना बटाट्याच्या बास्केटस्मध्ये दोन-तीन बिटाचे तुकडे व (रंग गुलाबी चालणार असेल तर बीटही सर्व कंदमुळांबरोबर घाला.) त्यावर हे चीजी कंदमुळांचे मिश्रण दोन-तीन मोठे चमचे घाला. त्यावर चिली क्रलेञ्चस, थोडे सिझनिंग भुरभुरा. चीज किसून घाला व पाच मिनिटे ओव्हनमध्ये गरम करून सर्व्ह करा.
(ह्याबरोबर दोन-तीन मोठे चमचे उकडलेला पास्ता किंवा मॅरीनेट व शॅलो फ्राय केलेले पनीर घालू शकतो. तळलेल्या नूडल्स घालून सुशोभित करा.)
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
नंदिनी बिवलकर, मुंबई