बीटरूट चमचम
साहित्य: २ बीट, १/३ कप साखर, ३ मोठे चमचे पाणी, १/२ छोटा चमचा वेलची पावडर.
स्टफिंगसाठी साहित्य: १/३ कप पनीर, १ मोठा चमचा मिल्क पावडर, ११/२ मोठा चमचा पिठीसाखर, १/२ छोटा चमचा वेलची पावडर, १ मोठा चमचा काजू-बदाम काप, २ छोटे चमचे केशर दूध.
सजावटीसाठी: सिल्वर बॉल.
कृती: प्रथम बीट स्वच्छ धुऊन त्याची साल काढून त्याच्या गोल पातळ चकत्या करा. मग पॅनमध्ये थोडे पाणी घालून त्यात बिटाच्या चकत्या घालून चार मिनिटे अर्धवट उकळा व नंतर निथळून घ्या. नंतर साखर व पाणी एकत्र करून उकळी काढा व त्यात निथळलेल्या चकत्या घालून एक-दोन मिनिटे उकळवा. मग त्यात वेलची पूड मिञ्चस करा. नंतर पाक कोमट झाल्यावर त्यातील चकत्या काढून घ्या व डिशमध्ये ठेवा.
आता स्टफिंग तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये पनीर, मिल्क पावडर, पिठीसाखर, वेलची पावडर, काजू-बदामाचे काप, केशराचे दूध सर्व एकत्र करून त्याचे लहान-लहान रोल बनवून घ्या. पाकातून काढलेल्या बिटाच्या चकत्या घेऊन त्यात पनीर रोल ठेवून टॅकोजचा आकार द्या. (मोठे बीट उपलद्ब्रध झाल्यास आपण त्याचे छान रोलही बनवू शकतो.)
आता तयार बीटरूट चमचम डिशमध्ये ठेवून त्यावर सिल्व्हर बॉल घालून सजवा. बीटबरोबर पनीर व केशरची चव छान लागते. अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सायली जोशी, नाशिक