नारायणी सूप
साहित्य: १०-१२ शतावरीच्या मुळ्या, प्रत्येकी १/४ वाटी कोबी, क्रलॉवर, दुधी भोपळा, गाजर, कोथिंबीर, २ चमचे लोणी, चवीनुसार मीठ व साखर, १ चमचा कॉर्नक्रलोअर.
कृती: शतावरीच्या मुळ्या स्वच्छ धुवा. नऊ-दहा तास पाण्यात भिजत घाला. नंतर त्या सोलून मधला नार काढून टाका व गरांचे मिञ्चसरमधून दूध काढा. दुधामध्ये शतावरीचा चोथा असल्यामुळे दूध गाळून घ्या. सर्व भाज्या लोण्यावर वाफवा. नंतर त्या मिञ्चसरमधून बारीक करा. अगदी पेस्ट करू नका, जाडसर ठेवा (सूप पिताना भाजीचा तुकडा तोंडात आला तर छान लागते). त्यात चार-पाच वाट्या पाणी घालून गॅसवर ठेवा. त्यामध्ये शतावरीचे दूध घाला. चवीनुसार मीठ व साखर घाला व सर्वात शेवटी कॉर्नक्रलोअरची पेस्ट घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व गरमगरम सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मृणालिनी जमदग्नी, सातारा