मिक्स पापड
साहित्य: १ किलो तांदूळ, १/४ किलो चणाडाळ, १/४ किलो उडीदडाळ, १/४ किलो मूगडाळ, १/४ किलो तूरडाळ, १ वाटी पोहे, १/२ वाटी जिरे, ४ छोटे चमचे पापडखार, १ छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा ओवा, चवीनुसार तिखट व मीठ.
कृती॒: प्रथम तांदूळ धुऊन पाणी घालून दोन दिवस भिजत ठेवा. दोन दिवसांनी पाणी उपसून कडकडीत वाळवा. सर्व डाळी फडञ्चयाने पुसा. तांदूळ, डाळी, जिरे गिरणीतून बारीक दळा. पीठ एका भांड्याने मोजा. त्याच भांड्याने पिठाएवढेच पाणी घ्या व एका पातेल्यात हे पाणी उकळायला ठेवा. या पाण्यामध्ये हिंग, पापडखार, ओवा, तसेच चवीनुसार तिखट व मीठ घालून पाणी ढवळा. पाण्याला उकळी आली, की पीठ घालून चांगले एकजीव करून झाकण ठेवा. चार-पाच मिनिटे शिजवा. पीठ गरम असताना मळा. पापडाचे छोटे गोळे लाटा. दोन-तीन दिवस पापड कडकडीत उन्हात वाळवा, हवाबंद डद्ब्रयात भरून ठेवा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
भाविका गोंधळी, ठाणे