राईस-रागी रोझ
साहित्य:१ कप तांदळाचे पीठ, १ कप नाचणीचे पीठ, १ चमचा ओरेगॅनो, १ चमचा मिरेपूड, २ चमचे तीळ, १ चमचा पापडखार, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती:एक वाटी तांदळाच्या पीठात दोन वाट्या पाणी आणि चवीनुसार मीठ घालून पीठ कालवून घ्या. एका भांड्यात तीन वाट्या पाणी उकळवा. त्यात अर्धा चमचा ओरेगॅनो, अर्धा चमचा मिरेपूड, अर्धा चमचा पापडखार, एक चमचा तीळ घाला. पाणी उकळायला लागल्यावर कालवलेले तांदूळ पीठ त्यात घालून लाटण्याच्या साहाय्याने भराभर ढवळून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.
आता दुसरे भांडे घेऊन हीच कृती नाचणीचे पीठ घेऊन करा. (तुक्वही या प्रमाणात कितीही पीठ घेऊन पीठाची उकड काढू शकता). आता केक सजावट करताना जे स्टार नोझल वापरतो ते वापरून रोझ बनवा. प्लॅस्टिक बॅगला स्टार नोझल लावून बॅग ग्लासमध्ये ठेवून त्यात वरील उकड चमच्याने घाला. एका बाजूने तांदळाची उकड, दुसऱ्या बाजूने नाचणीची उकड घाला, क्वहणजे दोन्ही रंग वेगवेगळे दिसतील. आता प्लॅस्टिक पेपरवर फुलाप्रमाणे हे मिश्रण घाला. उन्हात चांगले वाळू द्या. वाळल्यावर घट्ट झाकणाच्या डद्ब्रयात भरा. हवे तेव्हा तळून किंवा मायक्रोवेव्हमध्ये तीस सेकंद भाजा. मस्त आगळ्यावेगळ्या चवीचे, दिसायला आकर्षक असे राईस-रागी रोझ तयार आहेत.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सुषमा पोतदार, नवीन पनवेल