crash diet | diet plans | weight loss diet

क्रॅश डाएटिंगचे धोके | अमिता गद्रे | The dangers of Crash Dieting | Amita Gadre

क्रॅश डाएटिंगचे धोके हल्ली ज्याला बघावे तो वजन कमी करण्याच्या मागे लागलेला असतो. पण अचानक सगळेच वजन कमी करण्याच्या मागे का लागले आहेत? कारण आजूबाजूला जिथे बघू तिथे सगळीकडे (जाहिराती, टीव्ही-सिनेमा) एकदम सडपातळ किंवा फिट व्यक्ती दिसतात. ज्यांचे वजन अधिक असते त्यांना मनपसंत जोडीदार काय, कपडेही मिळायला त्रास होतो. वर येताजाता ‘जरा डाएट कर की’ […]

kalakand recipe

काळे गाजर-बीट कलाकंद | शकील जमादार, कर्नाटक | Black carrot-Beet Kalakand | Shakeel Jamadar, Karnataka

काळे गाजर-बीट कलाकंद मिलेट टार्टसाठी साहित्य॒: १ कप मिक्स मिलेट पीठ (नाचणी, वरी, फॉक्सटेल), १/२ कप गव्हाचे पीठ, १/२ कप थंड लोणी, १ छोटा चमचा लिंबाचा रस, ५-६ छोटे चमचे बर्फाचे थंड पाणी. टार्टची कृती : एका भांड्यात मिक्स मिलेट व गव्हाचे पीठ घ्या. थंड लोणी पिठामध्ये घालून मिश्रण ब्रेडक्रंब्ससारखे दिसेपर्यंत हाताने फेटून घ्या.लिंबाचा रस […]

मूल

मूल…लाडावलेले की बिघडलेले? | परिणीता गणेश | Children of Today – Misunderstood or Spoiled? | Parinita Ganesh

मूल…लाडावलेले की बिघडलेले? मुलांवरील प्रेम व्यक्त करायचे म्हणजे त्यांचे लाड करायचे, ही आजच्या पालकांची व्याख्या. मात्र असे लाड करताना आपण अतिलाड करून त्यांना बिघडवत तर नाही ना किंवा भौतिक सुख म्हणजेच मुलांचा आनंद असतो का, या प्रश्नांची उत्तरे पालकांनी शोधायला हवीत. अतिलाड झाल्यामुळे मुले हट्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आपल्या मुलांचे लाड करताना […]

puranvadi

तिखट पुरणवडी | सुरेखा भामरे, पुणे | Spicy Puranvadi | Surekha Bhamre, Pune

तिखट पुरणवडी साहित्य॒: १ वाटी चणाडाळ, १/२ वाटी मूगडाळ, १/४  वाटी मटकी डाळ, १/४ वाटी मसूर डाळ, १/४ वाटी तुरडाळ, १/४ वाटी तांदूळ, प्रत्येकी छोटा चमचा हिंग, जिरे, ओवा, बडीशेप, धणे, ६-७ हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, आले, ५-६ लसूण पाकळ्या, थोडे तीळ, तेल, चवीनुसार मीठ, थोडीशी चिंच, २ वाट्या गव्हाचे पीठ व आवश्यकतेनुसार […]

Cancer | cancer awareness

कर्करोग – नियती की निवड? | डॉ. सुलोचना गवांदे | Cancer – Destiny or Choice? | Dr. Sulochana Gawande

कर्करोग – नियती की निवड? कर्करोगाचे केवळ नाव घेतले तरी सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरते. पण कर्करोग हा आजार नवा नाही. अगदी ३-४ हजार वर्षे जुन्या प्राचीन मानवी अवशेषांमध्येही या रोगाचे अस्तित्व सापडले आहे. मानवी शरीर हे कित्येक प्रकारच्या कोट्यवधी पेशींचे बनलेले असते. या पेशींचे नियंत्रण कक्ष त्यांच्या गुणसूत्रातील जनुकांमध्ये असते. तिथल्या नियमांनुसार पेशी त्यांचे काम […]

मोमोज | momos

राइस फ्लॉवर रुट्स मोमोज | भरत गोंधळी, मुरबाड | Rice Flower Roots Momos | Bharat Gondhali, Murbad

राइस फ्लॉवर रुट्स मोमोज आवरणासाठी साहित्य॒: १ कप कोनफळ, १ कप रताळे, १ कप करांदे (उकडून, साले काढून केलेल्या फोडी), चवीनुसार मीठ, १/४ छोटा चमचा मिरपूड, १/४ छोटा चमचा सोया सॉस. सारणासाठी साहित्य: प्रत्येकी १/४ कप सिमला मिरची, गाजर, बीट, टोमॅटो, कोबी, पातीचा कांदा (बारीक काप केलेला), १/२ छोटा चमचा मिरपूड, १ छोटा चमचा आले-लसूण […]

गरम पाणी | hot water

गरम पाणी हितकारक कसे ? | वैद्य उर्मिला पिटकर | How is hot water beneficial? | Dr. Urmila Pitkar

गरम पाणी हितकारक कसे? मानवी शरीरासाठी ‘पाणी’ अत्यंत आवश्यक आहे. पण, हे पाणी कोणी, किती, कधी, कसे प्यावे याचेही काही नियम ठरलेले आहेत. शरीराला पाण्याची किती गरज आहे, हे नैसर्गिकरित्या आपल्याला लागणाऱ्या तहानेद्वारे सुचवले जाते. हिवाळ्यात व पावसाळ्यात तहान कमी लागते, याउलट उन्हाळ्यात अधिक तहान लागते. शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांना अधिक तहान लागते, तर एसीमध्ये […]

उपवास | fasting

उपवास: शाश्वत आनंदाचा शोध | सचिन परब | Fasting: The Search for Eternal Happiness | Sachin Parab

उपवास: शाश्वत आनंदाचा शोध ‘बायांनो, उपवास नेहमीच टाळा, निदान गरोदरपणात तरी टाळाच,’ अशी सूचना डॉक्टरांच्या ओपीडीबाहेरच्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर वाचून माझ्या शेजारच्या काकूंना धक्का बसला होता. कारण कळायला लागल्यापासून उपवास करण्याचे संस्कार मनावर बिंबवलेले असतात. या संस्कारांना प्रश्न विचारण्यासाठी डॉक्टरांची ही सूचना उपयोगी ठरली तर खरा उपवास घडू शकतो. कारण कोणताही विचार न करता स्वीकारलेल्या […]

Fara | chhatisgarh food

फरा | तृप्ती देव, छत्तीसगड | Fara | Trupti Dev, Chhattisgarh

फरा साहित्य॒: १ वाटी शिजलेला भात, १ वाटी तांदळाचे पीठ (कमी जास्त चालते), फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, तेल, थोडे तीळ व चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी. कृती: प्रथम भात, तांदळाचे पीठ व चवीनुसार मीठ एकत्र करून कणकेसारखे भिजवा. (भात जर मऊ असेल तर पाण्याची आवश्यकता नाही, पण जर आवश्यकता असेल तरच पाणी घाला.) या गोळ्याला थोडे […]

Food for life

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!’ | डॉ. सदानंद सरदेशमुख | Food Consumption Practices | Dr Sadanand Deshmukh

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!’ हल्ली वेळेची व कष्टांची बचत करण्याच्या हेतूने दोन-चार दिवस पुरेल इतके अन्नपदार्थ एकदाच शिजवून ते फ्रीजमध्ये भरून ठेवले जातात आणि आयत्या वेळी गरम करून खाल्ले जातात. मात्र वरचेवर अन्न गरम करून खाण्यामुळे तसेच फ्रीजमधील अन्नपदार्थ सेवन करण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेद शास्त्राने अन्न शक्यतो ताजे-गरम घ्यावे […]