राइस फ्लॉवर रुट्स मोमोज
आवरणासाठी साहित्य॒: १ कप कोनफळ, १ कप रताळे, १ कप करांदे (उकडून, साले काढून केलेल्या फोडी), चवीनुसार मीठ, १/४ छोटा चमचा मिरपूड, १/४ छोटा चमचा सोया सॉस.
सारणासाठी साहित्य: प्रत्येकी १/४ कप सिमला मिरची, गाजर, बीट, टोमॅटो, कोबी, पातीचा कांदा (बारीक काप केलेला), १/२ छोटा चमचा मिरपूड, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, १/४ छोटा चमचा सोया सॉस, लिंबाची ९ पाने, २ हिरव्या मिरच्या, अर्धा कप बासमती तांदूळ आणि चवीनुसार मीठ.
कृती: प्रथम बासमती तांदूळ एक तास पाण्यात भिजत ठेवा. कोनफळ, रताळे, करांदे चांगले कुस्करून त्यात मीठ, मिरपूड घालून मळून गोळा तयार करा. एका बाऊलमध्ये मिरची, गाजर, बीट, टोमॅटो, कोबी, पातीचा कांदा, हिरवी मिरची, मिरपूड, आले-लसूण पेस्ट, सोया सॉस व चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण हलकेच एकजीव करा. तांदूळ निथळून घ्या आणि एका ताटलीत पसरवा. आता मळलेल्या गोळ्यामधले २ मोठे चमचे मिश्रण हातावर घेऊन त्याची वाटी करा व सारण भरून हलकेच बंद करून लांबट आकाराचा गोळा तयार करा. अशा प्रकारे सर्व गोळे तयार करा. आता गॅसवर मोठी कढई ठेऊन त्यात २ कप पाणी उकळायला ठेवा. एक चाळण घेऊन त्यात लिंबाची पाने पसरवा. तयार केलेला गोळा तांदळावर घोळवून घ्या व चाळणीत ठेवून २० मिनिटे वाफवून घ्या आणि शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
भरत गोंधळी, मुरबाड