तंदुरी चिकन रुलाड
चिकन मॅरिनेशनसाठी साहित्य॒: ४ नग चिकन ब्रेस्ट, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, २ मोठे चमचे घट्ट दही, २ मोठे चमचे तंदुरी मसाला, १ मोठा चमचा बेसन, १ छोटा चमचा जिरेपूड, १ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा चाट मसाला, १ छोटा चमचा कसुरी मेथी, १ छोटा चमचा काश्मिरी लाल तिखट, १/४ छोटा चमचा काळीमिरी पूड, २ मोठे चमचे मोहरी तेल, चिकनच्या कॅरमेलायजेशनसाठी १ मोठा चमचा बटर व चवीनुसार मीठ.
स्टफिंगसाठी साहित्य: ३ कप ब्लांच केलेला आणि चिरलेला पालक, १/२ कप मोझरेला चीज, १/२ कप पारमेसन चीज, १ मोठा चमचा चिरलेला लसूण, १/४ छोटा चमचा काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ, २ चमचे ऑलिव्ह ऑइल.
ग्रिल करण्यासाठी: थोडे बटर
कृती: प्रथम चिकनचा ब्रेस्ट पिस घेऊन त्याला मधून चीर द्या, पूर्ण कापू नये. तो तुकडा उघडला गेला पाहिजे. चिकनचा तुकडा मीट हॅमरने ठोकून सपाट करून घ्या. आधी मॅरिनेशनचे साहित्य एकत्र करून त्यात चिकन मॅरिनेट करा. आता एका पॅनमध्ये २ चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करा आणि त्यात चिरलेला लसूण घाला. कच्च्या लसणाचा वास जाईपर्यंत लसूण परतून घ्या. पॅनमध्ये तयार ब्लांच पालक, काळीमिरी व मीठ घालून २-३ मिनिटे परतवा. मग थंड करा. थंड झालेल्या पालकमध्ये मोझरेला आणि पारमेसन चीज घालून चांगले एकजीव करा. चिकनचा तुकडा परत सपाट करून त्यावर पालकचे मिश्रण पसरवा. चिकनचा तुकडा रोल करून सुतळीने बांधून २ तास फ्रिजमध्ये ठेवा. ओव्हन १९०० वर प्रीहीट करून घ्या. एका पॅनमध्ये बटर घालून वितळवा. मग चिकनचा रोल केलेला तुकडा बटरमध्ये घोळवून प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १५ मिनिटांसाठी ग्रिल करा. थंड झाल्यावर सुतळ काढून सर्व्ह करा.
टीप: चिकनचा रस टिकवून ठेवण्या-साठी मॅरिनेट करण्यापूर्वी चिकन ब्रेस्ट मिठाच्या पाण्याच्या द्रावणात किमान ३० मिनिटे भिजवून ठेवा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
स्मिता गोरक्षकर, मुंबई