फरा
साहित्य॒: १ वाटी शिजलेला भात, १ वाटी तांदळाचे पीठ (कमी जास्त चालते), फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, तेल, थोडे तीळ व चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती: प्रथम भात, तांदळाचे पीठ व चवीनुसार मीठ एकत्र करून कणकेसारखे भिजवा. (भात जर मऊ असेल तर पाण्याची आवश्यकता नाही, पण जर आवश्यकता असेल तरच पाणी घाला.) या गोळ्याला थोडे तेल लावून ठेवा. घरी फूड प्रोसेसर असेल तर त्यातही करू शकता. मग हातावर लहान गोळी घेऊन त्याला लांब आकार द्या. अशा प्रकारे सर्व लंबगोल तयार करून घ्या. ज्या भांड्यामध्ये वाफवायचे आहे त्याला तेल लावून त्यात हे गोळे (फरा) वाफवून घ्या. १०-१५ मिनिटे वाफेवर शिजू द्या. थोड्या वेळाने टूथपिक टोचून बघा. शिजले असेल तर मिश्रण टूथपिकला चिटकणार नाही. हे गोळे शिजल्यावर गॅस बंद करा व थोडे थंड होऊ द्या. कढईमध्ये (नॉनस्टिक असेल तर उत्तमच) तेल गरम करून मोहरी, जिरे, मिरची, कढीपत्ता व तीळ टाका.मग या फोडणीवर फरा टाकून छान शिजू द्या किंवा फ्राय करा. तयार फरा हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खायला द्या.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
तृप्ती देव, छत्तीसगड