वाळवणाच्या पदार्थांचा चाट
साहित्य: २ ज्वारीचे पापड (धापोडा), ४ पोह्याचे मिरगुंड, ५ बाजरीच्या खारोड्या, प्रत्येकी एक छोटी वाटी चनाजोर, खारे मसाला शेंगदाणे, मसाला मखाणे, वाफवलेल्या रताळ्याच्या फोडी, ७ विलायती चिंचेचे तुकडे, ८ हिरवी मिरची तुकडे, १ पातीचा कांदा चिरून, एका टोमॅटोच्या बारीक फोडी, सजवण्यासाठी डाळिंबाचे दाणे व कोथिंबीर, १ छोटी वाटी फेटलेले दही, २ छोटे चमचे चिंचेचे पंचामृत.
हिरवी चटणीचे साहित्य व कृती: १ छोट्या कैरीचा किस, ४ पाने पुदिना, ५ हिरवी द्राक्षे, आवश्यकतेनुसार कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ, जिरे, गूळ एकत्र करून बारीक करा.
कृती : प्रथम ज्वारीचे पापड व मिरगुंड तळून घ्या. रताळ्याच्या फोडी कढईत घालून त्यावर पंचामृत व चाट मसाला लावून घ्या. एका बाऊलमध्ये कांदा पात, टोमॅटोच्या फोडी, विलायती चिंचेचे तुकडे, शेंगदाणे, मखाणे, दही, चाट मसाला व चनाजोर, खारोड्या, मिरगुंड व बारीक केलेला धापोडा घ्या.आता केळीच्या किंवा हळदीच्या पानांचा गोल करून त्यामध्ये दुसरा धापोडा ठेवून हे मिश्रण टाकून वर पंचामृत, हिरवी चटणी, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे टाकून सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
लता पांडे, नागपूर