शेवग्याचे पौष्टिक थालीपीठ
साहित्य: २ शेवग्याच्या शेंगा, १०-१२ शेवग्याची फुले, पाने, १ लाल टोमॅटो, तिळाचे तेल, ओवा, मिरची किंवा तिखट, थोडा गूळ, कोथिंबीर, मूठभर मेथी पाने, १ कांदा, चवीनुसार मीठ.
थालीपीठ भाजणी: पाव किलो हातसडीचे तांदूळ, प्रत्येकी एक वाटी अख्खा हरभरा, काळे उडीद, बाजरी, ज्वारी, प्रत्येकी अर्धी वाटी हातसडीचे पोहे, राजमा, सोयाबीन, धणे, २ चमचे जिरे (भाजून दळून पूड करून घ्या)
कृती: शेवग्याच्या शेंगा उकडून गर काढा. त्यात फुले, पाने, कांदा, तिखट, कोथिंबीर, मेथी, तीळ, मीठ घाला. या मिश्रणात पाव किलो भाजणी, २ चमचे तेल घालून मळून घ्या. पातळ थालीपीठ थापून शेकवून घ्या.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अपूर्वा कुलकर्णी, सोलापूर