ग्रिल्ड ॲपल स्टफ्ड चिकन
साहित्य: ३ मोठे चमचे तेल, प्रत्येकी १/२ कप बारीक चिरेलेले सफरचंद, चीज, १/४ कप बारीक चिरलेला कांदा, १/२ किलो चिकन (ब्रेस्ट पीस), १ छोटा चमचा बारीक चिरलेली लसूण, १ मोठा चमचा मोहरीची पेस्ट, २ छोटे चमचे काळीमिरी, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती: चाकूने चिकनमध्ये पोकळी (खिसा) करून घ्या. हे करताना चाकू चिकनच्या बाहेर जाता कामा नये. कारण स्टफिंग बाहेर जाईल. प्रत्येकी १ छोटा चमचा काळीमिरी व तेल तसेच मोहरीची पेस्ट आणि चवीपुरते मीठ एकजीव करून घ्या. हे मिश्रण चिकनला लावून ३० मिनिटे मॅरिनेट करत ठेवा. सारणासाठी एका पॅनमध्ये १ मोठा चमचा तेल गरम करून त्यात कांदा घाला. मिनिटभर परतल्यावर त्यात लसूण, मीठ आणि १ छोटा चमचा काळीमिरी पूड घालून त्यावर सफरचंदाचे तुकडे घाला. हे मिश्रण ५ मिनिटे शिजवून त्यात चीज घाला. मग गॅस बंद करून सारण एकजीव करा. सारण पायपिंग बॅगमध्ये भरून त्याद्वारे चिकनमध्ये स्टफ करा. पॅन किंवा ग्रिल्ड पॅनमध्ये १ मोठा चमचा तेल घालून त्यावर चिकन घाला व ५-५ मिनिटे दोन्ही बाजूने शिजवून घ्या. नंतर ओव्हनमध्ये १०-१५ मिनिटे १८० डिग्रीवर बेक करा. ओव्हन नसल्यास कढईत १०-१५ मिनिटे भाजून घ्या. आता चिकनचे तुकडे करून वरून कोथिंबीर घाला. तयार ‘ॲपल स्टफ चिकन’ मॅश पोटॅटोसोबत सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सार्थक भोस्कर, पालघर