आइस्क्रीम | karwand ice cream | ice cream recipe | summer recipes | indian ice cream recipe | homemade ice cream

करवंद आइस्क्रीम | सुमेधा जोशी, नाशिक | Karwand Ice Cream | Sumedha Joshi, Nashik

करवंद आइस्क्रीम

साहित्य: १ लिटर फूल फॅट दूध (आइस्क्रीम बेससाठी), ४ मोठे चमचे साखर, ११/२ मोठे चमचे कॉर्नफ्लोअर, १/४ कप साधे दूध, ३ मोठे चमचे दुधावरची घट्ट साय, ३/४ कप तयार करवंद (करवंद जामसाठी), १/२ कप साखर.

कृती: प्रथम आइस्क्रीम बेस तयार करण्यासाठी फूल फॅट दूध एका पातेल्यात घेऊन गॅसवर पाच मिनिटे उकळत ठेवा. नंतर त्यात साखर घालून सात ते आठ मिनिटे उकळून घ्या. एका कपात साधे दूध घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर मिक्स करून ती पेस्ट वरील उकळत्या दुधात हळूहळू ओतून एकीकडे दूध सतत ढवळत रहा म्हणजे त्यात गाठी तयार होणार नाहीत.

हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत सतत ढवळत राहा. मग ते थंड करून एका हवाबंद डब्यात ओतून त्याला वरून सिल्वर फॉइलने झाकून बंद करा. नंतर झाकण लावा म्हणजे त्यात घड्या पडणार नाहीत. आता तो डबा प्रथम डिफ्रॉस्ट करून घेतलेल्या फ्रिजमध्ये ७-८ तास सेट होण्यासाठी ठेवून द्या.

करवंद जाम बनवण्यासाठी प्रथम करवंद अर्धा तास पाण्यात भिजत घालून नंतर चोळून स्वच्छ धुऊन घ्या. मग त्यातील बिया काढून घ्या. मग एका पॅनमध्ये करवंद व साखर मिक्स करून साखर विरघळून घट्टसर होईपर्यंत परतत राहा. मग गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घ्या. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक करा, म्हणजेच त्याचा जाम बनवून घ्या. जाम बनवताना साखरेचे प्रमाण आपल्याला हवे तसे कमी-जास्त करा.

आता फ्रिजरमधील बेस काढून त्याचे लहान लहान तुकडे कापून घ्या. हे तुकडे एका पातेल्यात काढून छान क्रिमी होईपर्यंत फेटून घ्या. मग त्यात करवंद जाम आपल्या आवडीनुसार घालून (मी इथे ४ मोठे चमचे करवंद जाम वापरला) परत एकदा बीट करून डब्यात घालून वरीलप्रमाणे पॅक करा. सात-आठ तास सेट करा. करवंद आइस्क्रीम तयार झाल्यावर आइस्क्रीम बाउलमध्ये स्कूपने काढून त्यावर करवंद जाम घाला व डिशमध्ये ठेवून गार्निश करा.

टीप: करवंदामध्ये पोटॅशियम व्हिटॅमिन ‘ए, बी, सी’ तसेच कॅल्शियमचे प्रमाणही भरपूर असते. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. हृदयाचे संरक्षण होते.तसेच मधुमेह, किडनी, पोटाचे विकार, उष्णतेचे विकार अशा बऱ्याच विकारांमध्ये फायदा होतो.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


सुमेधा जोशी, नाशिक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.