केसर मलई आइस्क्रीम
साहित्य: १ कप शहाळ्याची मलई, १/२ कप भिजवलेले काजू, १/४ कप गूळ पावडर, ४ खजूर, १/३ कप नारळ पाणी, भिजवलेल्या केशरच्या १० काड्या, १ चिमूटभर वेलची पावडर, १ चिमूटभर सैंधव मीठ.
कृती :प्रथम एका मिञ्चसरच्या भांड्यात शहाळ्याची मलई , भिजवलेले काजू , गूळ पावडर , खजूर , नारळ पाणी , केसर , वेलची पावडर , मीठ हे सर्व साहित्य घालून मिञ्चसरला फिरवून घ्या. छान अशी मऊ पेस्ट तयार झाली, की कुल्फीच्या साच्यात भरा किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा. दोन तासानंतर आइस्क्रीम/कुल्फी तयार झाली असेल.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
नमिता गटणे, नाशिक