जांभळाचे रसम
साहित्य: १०० ग्रॅम शिजवलेली तूरडाळ, १०० ग्रॅम जांभळाचा गर, २-३ हिरव्या मिरच्या, १/४ छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा साखर, १०-१२ कढीप॔ा पाने, १/४ वाटी खवलेला नारळ, १ मोठा चमचा तेल किंवा तूप, १/४ छोटा चमचा मोहरी, १ छोटा चमचा कोथिंबीर, मीठ (चवीनुसार).
कृती: मिञ्चसरमध्ये जांभळाचा गर फिरवून घ्या. डाळ घोटून त्यात अर्धा लिटर पाणी घालून उकळायला ठेवा. आता त्यात मीठ, हिंग, कढीपत्ता व मिरच्या घालून उकळी आणा. नंतर यात जांभळाचा रस घाला. खोबरे वाटून घाला, साखर घाला. नंतर तुपावर किंवा तेलावर केलेली मोहरीची फोडणी घाला. कोथिंबीर घाला. यात थोडे जांभळाचे कापसुद्धा घालू शकता.
टीप:* साखर न घालता हे रसम केल्यास मधुमेहींसाठी चालू शकते.* असा रसम संत्र्याचाही करू शकतो.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्रभा गांधी, सोलापूर