गाजराची बासुंदी
साहित्य: ३ ते ४ मध्यम आकाराची गाजरे, १/२ लिटर दूध,२ मोठे चमचे साखर, ७-८ बदाम, १/२ छोटा चमचा वेलचीपूड, १/२ छोटा चमचा चारोळी, बदाम, पिस्ते (सजावटीसाठी).
कृती: गाजरे स्वच्छ धुऊन त्याचे मोठे तुकडे करा. त्यामध्ये दूध घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करा. त्यात बदाम-वेलची पावडर आणि साखर घालून एकत्र करून घ्या. हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड करून घ्या. काचेच्या बाऊलमध्ये सजावट करून गाजराची बासुंदी सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
विद्युल्लता साळी, पुणे