उपवासाचे बटाट्याचे लाडू
साहित्य: ४ उकडलेले बटाटे, २ मोठे चमचे साजूक तूप, २ मोठे चमचे मिल्क पावडर, ३ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क, ३ मोठे चमचे साखर (आवडीनुसार कमी-जास्त), चिमूटभर मीठ, १/४ छोटा चमचा वेलचीपूड, सुका मेवा, बारीक खोबऱ्याचा कीस.
कृती: बटाटे उकडून आणि किसून घ्या. गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम झाल्यानंतर त्यात बटाट्याचा कीस टाका आणि ४-५ मिनिटे परतून घ्या. त्याचा रंगही बदलतो आणि सुवासही येतो. आता त्यात मिल्क पावडर व नंतर कंडेन्स्ड मिल्क टाकून एकत्र करा. चवीनुसार साखर आणि चिमूटभर मीठ घालून मिश्रण चांगले मिक्स करा. मग त्यात आवडीनुसार सुका मेवा आणि वेलचीपूड घालून मिक्स करून घ्या व गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर, त्याचे लाडू वळून घ्या. लाडू तयार झाल्यावर बारीक खोबऱ्याच्या किसात घोळवून घ्या.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या
वर्षा बेले, नागपूर