आमसुली आइस्क्रीम
साहित्य: २५० मि.ली. म्हशीचे दूध (फूल फॅट दूध), ४ छोटे चमचे स्पून साखर, २ छोटे चमचे जी.एम.एस. पावडर, १/४ छोटा चमचा सी.एम.सी. पावडर, ११/२ छोटा चमचा कॉर्नफ्लोअर, ३ छोटे चमचे मिल्क पावडर, ३ छोटे चमचे कोकम सिरप, साखरेच्या पाकातली ४ आमसुले, ४ छोटे चमचे रीच क्रिम किंवा घरची साय.
कृती: पाव लिटर दुधापैकी अर्धी वाटी दूध घ्या. त्यात मिल्क पावडर, कॉर्नफ्लोअर, जी.एम.एस. पावडर, साखर, सी.एम.सी. पावडर घालून चांगले ढवळून घ्या. आता बाकीचे दूध गरम करायला ठेवा. गरम करत असलेल्या दुधात वरील मिश्रण घालून सतत ढवळत राहा व चांगले उकळल्यावर सामान्य तापमानावर आल्यानंतर त्यामध्ये कोकम सिरप घाला. आता हे मिश्रण फ्रिजमध्ये ६-७ तास घट्ट करण्यासाठी ठेवा. नंतर त्यामध्ये क्रीम घालून बीटरने फिरवून घ्या. नंतर त्यामध्ये आमसुलाचे छोटे काप करून घाला व परत ७-८ तास फ्रिजमध्ये ठेवा. छान आंबटगोड आइस्क्रीम तयार होते.
टीप: अॅसिडीटीसाठी उत्तम असे आइस्क्रीम.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मयुरी दोभाडा, पुणे