खर्डा चिकन वडा
साहित्य: १/४ किलो चिकन, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/२ चमचा हळद पावडर, १/२ चमचा लाल तिखट, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
खर्डा: ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ७ ते ८ लसूण पाकळ्या, मीठ (चवीनुसार), तेल
कृती: प्रथम हिरव्या मिरच्या तेलावर भाजून घ्या. लसूण पाकळ्या, मीठ घालून खर्डा तयार करा.
थोडा कांदा तेलावर परता, त्यावर हळद व मीठ घाला. आता चिकन घालून परता. नंतर पाणी घालून चिकन शिजवून घ्या. थंड झाल्यावर चिकनचे बारीक तुकडे करुन घ्या. कांदा तेलावर परता त्यामध्ये खर्डा घाला. चिकनचे तुकडे घाला. भाजी कोरडी करुन कोथिंबीर घाला. थंड झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करा (बटाटावड्याप्रमाणे). बेसन पिठात किंचित हळद घाला. वड्याप्रमाणे पीठ भिजवा. त्यामध्ये चिकनचे गोळे बुडवून वडे तेलात तळून घ्या.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कुसुम झरेकर, पुणे