चिली मिली कूल कूल
साहित्य: १ गाजर, प्रत्येकी एक लाल, पिवळी व हिरवी भोपळी मिरची (सजावटीसाठी), १ वाटी अननसाचे बारीक तुकडे, १ वाटी आठळ्या काढून फणसाचे गरे, २ आंबे (साल काढून फोडी करून), १/४ चमचा मेथ्या, १ मोठा चमचा तेल, चवीनुसार हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, १ लिटर दूध, फणसाच्या वाफवून घेतलेल्या ८ आठळ्या, ३/४ वाटी साखर, ३ थेंब व्हॅनिला इसेन्स.
कृती॒: तेल गरम करून हिंग, हळद, मेथ्या घालून फोडणी करा. त्यात अननसाचे तुकडे आणि फणसाचे गरे शिजवून घ्या. त्यानंतर आंद्ब्रयाच्या लहान-लहान फोडी व थोडा रस घाला. चवीनुसार गूळ व किंचित मीठ घाला. थंड झाल्यावर मिश्रणाचा गोळा करून फ्रिजरमध्ये ठेवा.
दूध आटवून रबडीसारखे अर्धे करा आणि फणसाच्या आठळ्या किसून त्यात घाला. त्याच वेळेस साखर घाला. थंड झाल्यावर फ्रीजरमध्ये ठेवा. दर तीन तासाने घट्ट झालेले दूध चार वेळा मिञ्चसरमधून फिरवा. आता आटवलेले दूध घ्या. यात थंड झालेल्या मिश्रणाचा गोळा घाला आणि फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्या.
हे आइस्क्रीम भोपळी मिरच्यांच्या गाडीतून सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
संजीवनी कुळकर्णी, मुंबई