कंदमुळांचे नेट रोल्स
वापरलेली कंदमुळे: बीट, रताळे, गाजर
नेट रोलसाठी साहित्य: डोशाचे पीठ (३ वाट्या तांदूळ, १ वाटी उडीद डाळ), बीट किसून, वाटून, गाळून घेतलेले गुलाबी पाणी.
सारणासाठी साहित्य: १ रताळे (मायक्रोवेव्हमध्ये भाजून घेतलेले), १ गाजराचा कीस, १/२ वाटी ओले खोबरे, ५ छोटे चमचे साखर, १ छोटा चमचा तूप, २ छोटे चमचे मध, वेलचीपूड.
कृती: तुपावर गाजराचा कीस परता. खोबरे व साखर घालून हा कीस पुन्हा एकदा परतून घ्या. भाजलेल्या रताळ्याचे काप करून घाला. मध, वेलचीपूड घालून मिश्रण एकत्र करा.
नेट रोलची कृती: डोशाच्या पिठामध्ये बिटाचे पाणी घालून गुलाबी रंगाचे पीठ तयार करून घ्या. प्लॅस्टिकच्या/दुधाच्या पिशवीत हे पीठ भरून घ्या. पिशवीला बारीक कट देऊन नॉनस्टिक तव्यावर या पिठाच्या आडव्या उभ्या रेषा मारत लहान नेट डोसे बनवा. या नेट डोशांच्या मध्यभागी सारण आडवे ठेवून रोल तयार करा. याप्रमाणे सर्व रोल तयार करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मंजुषा दिघे, बोरीवली