पौष्टिक ढोकळा
साहित्य: २ वाट्या गव्हाचा कोंडा, १ मोठा चमचा मटकीची डाळ, १ मोठा चमचा गव्हाचे पीठ, १ मोठा चमचा तूप, १ मोठा चमचा लाल तिखट, कोथिंबीर, १/४ छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ.
कृती: गव्हाचा कोंडा, गव्हाचे पीठ, मटकीची डाळ, मीठ, लाल तिखट, हळद, कोथिंबीर आणि तुपाचे मोहन घालून पीठ लागेल तसे पाणी टाकून घट्टसर मळून घ्या. पिठाचे छोटे गोळे (ढोकळे) करून मध्यभागी गोल करा. हे ढोकळे इडलीच्या भांड्यात चाळणीवर वीस मिनिटे वाफवून घ्या. ढोकळे थंड झाल्यावर त्यावर वरून तूप आणि काऱ्हळ्याची चटणी घाला. कोथिंबीर घालून सजवा.
टीप: हा ढोकळा वरणाबरोबर सर्व्ह करू शकता.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
उन्नती शेटीया, अहमदनगर