पंच ‘ख’चे पौष्टिक लाडू
साहित्य: १/४ किलो खजूर, ५० ग्रॅम खसखस, २०० ग्रॅम खवा, ५० ग्रॅम खारीकपूड, २०० ग्रॅम ओले खोबरे, १ छोटा चमचा वेलचीपूड.
कृती: खसखस भाजून त्याची पूड करून घ्या. खजुरातल्या बिया काढून वाटून घ्या. एका कढईत खवा घेऊन मंद आचेवर परतवा. त्यात खजूर पेस्ट, खसखस, खारीकपूड, वेलचीपूड, ओले खोबरे घालून सर्व एकजीव करून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू वळा.
टीप: हे लाडू पटकन खाऊन संपवा. खवा, ओले खोबरे असल्या-मुळे ते फार दिवस टिकत नाहीत.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– मनीषा भिडे, ठाणे