आलू | dum aloo recipe | aloo dum recipe

दम आलू | शेफ राहुल वल्ली | Dum aloo | Chef Rahul Valli

दम आलू

साहित्य: ४ बटाटे (पहाडी बटाटे असल्याची खात्री करून घ्या), तळणासाठी आणि फोडणीसाठी ३०० मिली मोहरीचे तेल, ३ मोठे चमचे काश्मिरी मिरचीची पावडर, ३-४ लवंगा, वेलचीचे २ दाणे, २ मोठे चमचे दही, १ छोटा चमचा सुंठपूड, ४ छोटा चमचा गरम मसाला, १ मोठा चमचा बडिशेप पूड, २ तमालपत्रे, २ कप पाणी, चवीनुसार मीठ, / इंच दालचिनी, / छोटा चमचा हिंग, मसाला वेलची, हिरवी वेलची.

कृती: बटाटे कुकरला लावून दोन शिट्ट्या काढा. पाणी काढून बटाट्याची साले काढा. टूथपिकने बटाट्यांना छिद्र करा. कढईमध्ये तेल तापत ठेवा. बटाटे सोनेरी रंगाचे होईपर्यंत हलके तळून घ्या. जाड बुडाच्या कढईमध्ये १०० मिली मोहरीचे तेल तापत ठेवा. (तुम्ही तळणाचे तेलही वापरू शकता). तेल तापल्यावर त्यात लवंगा, हिंग, दालचिनी, तमालपत्र घालून थोडा वेळ परता. त्यात काश्मिरी मिरचीपूड आणि दही घालून सतत ढवळत राहा. हा रस्सा दाटसर झाला पाहिजे. त्यात आवश्यकता असल्यास अर्धा कप पाणी घाला आणि ढवळत राहा. त्यात मसाला व हिरवी वेलची, सुंठपूड, मीठ घालून मिनिटभर शिजवून घ्या. आता पाणी, बटाटे आणि बडिशेपची पूड घाला. २-४ मिनिटे उकळत ठेवा. कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर ३० मिनिटे हा रस्सा शिजू द्या. त्यावर गरम मसाला भुरभुरा आणि पुन्हा एकदा मिनिटभर शिजवून घ्या. गॅस बंद करून पाच मिनिटे वाफेवर ठेवा आणि भातासोबत गरम गरम दम आलू वाढा.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


शेफ राहुल वल्ली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.