रागी मिलेट खजूर ड्रायफ्रूट केक
साहित्य: १ वाटी नाचणीचे पीठ, १/४ वाटी ड्रायफ्रूट पावडर, ११/२ वाटी बिया काढून घेतलेला खजूर, १ चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर बेकिंग सोडा, १/४ वाटी तेल किंवा बटर, १ कप दूध, २ ते ४ थेंब व्हॅनिला इसेन्स, दीड वाटी मीठ.
कृती: नाचणी पीठ, बेकिंग पावडर, सोडा, मीठ एकत्र करून चाळून घ्या.खजूर दुधात भिजवून पेस्ट करून घ्या.चाळलेल्या पिठात बटर, ड्रायफ्रूट पावडर, व्हॅनिला इसेन्स व खजुराची पेस्ट घालून एकजीव करा.गरज भासल्यास आणखी दूध घालून पीठ भिजवून हलके होईपर्यंत फेटा व दहा मिनिटे बाजूला ठेवा.कुकरच्या तळाशी मीठ नीट पसरवून त्यावर स्टँड ठेवा.रिंग, शिटी न लावता कुकरचे झाकण लावून पाच-सहा मिनिटे प्रीहीट करा.केकच्या भांड्याला तेल लावून त्यावर कणीक भुरभुरुन केकचे भांडेटीन करून घ्या. त्यात फेटलेले पीठ नीट पसरवून घ्या. केक कुकरमध्ये २० ते २५ मिनिटे बेक करा.टूथपिकच्या साहाय्याने केक शिजला का नाही, ते तपासा. केक थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढून हव्या त्या आकारात कापून सर्व्ह करा.
टीप: केकचे पीठ तयार करताना बटर वापरले असेल तर मीठ वापरू नका. चॉकलेट आवडत असल्यास केकवर चॉकलेट सिरप घाला.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शिल्पा लाभे, नागपूर