लो कॅलरी समोसे
साहित्य: १ कप गव्हाचे पीठ, थोडेसे तेल, चवीनुसार मीठ, १ मोठी वाटी मटकी, हरभरा, मूग, ३ छोटे चमचे लाल तिखट, २ छोटे चमचे चाट मसाला, १ छोटा चमचा मिरीपूड, १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, १ छोटा चमचा जिरेपूड.
सजावटीसाठी: काकडी, लाल व हिरवी चटणी, कांदा, कोथिंबीर‧
सारणाची कृती: मटकी, मूग, हरभरे भिजवून मोड आणून घ्या.कुकरमध्ये मीठ टाकून बारा मिनिटे वाफवा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात मिरीपूड, चाट मसाला, मीठ, जिरेपूड, आले-लसूण पेस्ट आणि लाल तिखट घालून सर्व मिश्रण एकजीव करा.
कृती: पीठ चाळून घ्या, त्यात तेलाचे मोहन, मीठ घालून मळून घ्या.पिठाचे छोटे गोळे करून पोळी लाटून घ्या. पोळीमध्ये कडधान्यांचे सारण भरा .पोळीला सामोशाचा आकार द्या. एका प्लेटला तेल लावून त्यात तयार समोसे ठेवा. ही प्लेट कुकरमध्ये ठेवून समोसे १५ मिनिटे वाफवा.कुकर थंड झाल्यावर तयार समोसे कोथिंबीर, कांदा, काकडीच्या कापाने सजवा. हे समोसे हिरव्या, लाल चटणीसोबत सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अनिता श्रीश्रीमाळ, छ.संभाजीनगर