फ्यूजन कबाब
साहित्य: १/४ किलो मटण खिमा, १०० ग्रॅम मटण कलेजी, २ मोठे चमचे हिरवे वाटण (आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर), २ कांदे, १ छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, २ चमचे मिक्स मसाला, १ छोटा चमचा गरम मसाला, प्रत्येकी १ छोटा चमचा पुदिना पेस्ट, टोमॅटो सॉस, चिंच-खजूर चटणी, चिली सॉस, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले, लसूणचे बारीक तुकडे, १ उकडलेला बटाटा, ४ मोठे चमचे ब्रेडक्रम्ब्ज, तेल, १ वाटी कोथिंबीर, सजावटीसाठी कांद्याच्या रिंग्ज.
कृती: खिमा व कलेजी धुऊन त्याला हिरवे वाटण, हळद, मीठ, मिक्स मसाला, गरम मसाला लावून दहा मिनिटे ठेवा. दोन वेगवेगळ्या भांड्यात तेल टाकून त्यात कांदा आणि हिरवे वाटण टाकून परतून घ्या. त्यात अनुक्रमे खिमा, कलेजी कोरडी शिजवून घ्या. कोरड्या केलेल्या खिम्यात उकडलेला बटाटा घालून त्याच्या वाट्या बनवा. कोरडी केलेली कलेजी कुस्करून थोडी मिक्सरला फिरवून घ्या. तेलावर बारीक चिरलेली मिरची, आले-लसूण परता. त्यात पुदिना पेस्ट, टोमॅटो सॉस, चिली सॉस, चिंच-खजूर चटणी घालून परता. वरून कोथिंबीर, कलेजीचे मिश्रण घालून एकजीव करून त्याचे गोळे बनवा. खिम्याच्या वाटीत हे गोळे भरून वाटी बंद करा. गोळ्याला चपटा आकार देऊन ब्रेडक्रम्ब्जमध्ये बुडवून तेलावर शॅलो फ्राय करा. कबाब कांद्याच्या रिंग्जने सजवून सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
निता पाठारे, मुंबई