गोडी हुग्गी
उत्तर कर्नाटकातील हा एक चविष्ट व अत्यंत लोकप्रिय पदार्थ. सणासुदीला, लग्नसमारंभात हा पदार्थ हमखास बनवला जातो. गहू, गूळ, तूप आणि सुकामेवा या जिन्नसांपासून हा पदार्थ बनवला जातो.
साहित्य : १ कप गहू, दीड कप गूळ, ३-४ छोटे चमचे तूप, ८-१० काजू, ८-१० बेदाणे, ३-४ छोटे चमचे खोवलेले सुके खोबरे, अर्धा छोटा चमचा वेलचीपूड, २ छोटे चमचे खसखस, अर्धा कप दूध.
कृती : गहू नीट धुऊन घ्या. १०-१२ तास ते भिजत ठेवा. कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून १० ते १२ शिट्ट्या काढा. गहू खाता येण्याइतके मऊ होणे अपेक्षित आहे. कढई मध्यम आचेवर गरम करा आणि त्यात शिजलेले गहू आणि गूळ घाला. या मिश्रणाला एक उकळी आणा, गूळ विरघळू द्या. गॅस बंद करून हे मिश्रण बाजूला ठेवा. दुसऱ्या कढईत खसखस १-२ मिनिटे भाजून घ्या. ती बाजूला काढून ठेवा. आता या कढईत तूप घाला आणि बेदाणे, काजू घालून ते तळून बाजूला ठेवा. आता खसखस, किसलेले खोबरे, बेदाणे, काजू, वेलचीपूड हे गहू आणि गुळाच्या मिश्रणात घाला. व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता यात उकळलेले दूध घाला आणि मस्तपैकी आस्वाद घ्या.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शेफ मयुर कामत
अतिशय पारंपरिक, चविष्ट आणि खास रेसिपी आहे ही कर्नाटकची. याला गोधी हुग्गी असे म्हणतात, “गोडी हुग्गी”नाही. खोबरे न घालता ओल्या नारळाचा कीस घालतात. तसेच एक छोटी लवंग पण चवीसाठी घालतात.