अटल अप्पे चाट
साहित्य: ८-१० फणसाच्या उकडलेल्या आठळ्या, १ वाटी बारीकरवा, १/२ वाटी दही, प्रत्येकी १ गाजर, कांदा, टोमॅटो, उकडलेले मका दाणे, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, चवीनुसार मीठ, २ मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा व चिमूटभर सोडा किंवा इनो.
चटणीचे साहित्य १ वाटीभर पुदिना, १/२ वाटी कोथिंबीर, २ मिरच्या, २ लसूण पाकळ्या, १/२ वाटी ओले खोबरे, लिंबू आणि मीठ.
कृती: चटणीचे सर्व साहित्य एकत्र करून चटणी वाटून घ्या. उकडलेल्या आठळ्या, मिरची, आले वाटून पेस्ट करा. या पेस्टमध्ये रवा, दही, गाजराचा किस, मीठ व सोडा टाकून दहा मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा. १० मिनिटांनंतर या मिश्रणाचे अप्पे बनवून घ्या. प्रत्येक अप्प्याच्या वरून थोडासा भाग काढून खोलगट वाटी करा. त्यामध्ये थोडी चटणी, बारीकचिरलेला कांदा, टोमॅटो, मक्याचे दाणे, डाळिंबाचे दाणे टाका. वरून शेव भुरभुरा आणि सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.