bean salad | corn recipe | salad recipe

रोस्टेड कॉर्न आणि बीन सॅलड | शेफ उमेश तांबे | Roasted Corn and Bean Salad | Chef Umesh Tambe

रोस्टेड कॉर्न आणि बीन सॅलड

साहित्य: २०० ग्रॅम स्वीट कॉर्न (मक्याचे दाणे), २ लाल सिमला मिरची, १ हिरवी सिमला मिरची, १ कांदा (बारीक चिरलेला), १ मोठा चमचा काश्मिरी मिरची पावडर, १ मोठा चमचा जिरे,  २-३ लसूण पाकळ्या, ३ मोठे चमचे एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, २५० ग्रॅम लाल भोपळा, ४०० ग्रॅम उकडलेला राजमा, ४०० ग्रॅम उकडलेले काबुली चणे, १२५ मिली व्हेजिटेबल स्टॉक, १ छोटा चमचा चिली सॉस, १ छोटा चमचा साखर, २ मोठे चमचे लिंबाचा रस, ३ मोठे चमचे कोथिंबीर, चवीनुसार मीठ व मिरपूड.

कृती: लाल व हिरव्या सिमला मिरचीच्या बिया काढून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. एका नॉनस्टिक पॅनमध्ये लाल व हिरवी सिमला मिरची,मक्याचे दाणे, लाल भोपळा, काश्मिरी मिरची व जिरे मध्यम आचेवर ५-१० मिनटांकरिता परतून घ्या. वरील मिश्रण एका बाऊलमध्ये काढून बाजूला ठेवून द्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण परतवा. मग त्यात उकडलेला राजमा, उकडलेले काबुली चणे, चिली सॉस व साखर घालून त्यातील पूर्ण पाणी सुकेपर्यंत मध्यम आचेवर ५-७ मिनिटांकरिता शिजवून घ्या. मिश्रण गॅसवरून उतरवून त्यात लिंबाचा रस व कोथिंबीर घाला. चवीनुसार मीठ व मिरपूड घाला. वरील मिश्रणात कॉर्नचे मिश्रण, ऑलिव्ह ऑइल घालून टॉस करा व सॅलड सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


शेफ उमेश तांबे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.