चिकन कबाब इन थ्री पेपर सॉस
साहित्य: २५०-३०० ग्रॅम बोनलेस चिकन, १ वाटी घट्ट दही, १ चमचा सोया सॉस, प्रत्येकी २ लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची, २ मध्यम आकाराचे कांदे, १ टोमॅटो, १०-१२ लसूण पाकळ्या, १-२ चमचे आले-लसूण पेस्ट, ११/२चमचा हळद, १-१ १/२चमचा काश्मिरी लाल तिखट, चवीनुसार मीठ, २ चमचे कसूरी मेथी, १ पॅकेट मॅगी नूडल, तेल.
कृती: प्रत्येकी एक सिमला मिरची, कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण भाजून घेऊन त्याची पेस्ट तयार करा. बोनलेस चिकनला मीठ, हळद, आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, दही व अर्धी सिमला मिरची पेस्ट लावून दोन-तीन तास बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यावर सिमला मिरचीची पेस्ट, कसूरी मेथी, मीठ घालून सॉस तयार करून घ्या. चिकनचे तुकडे ग्रील पॅनमध्ये भाजून घ्या. त्यानंतर चिकन सिमला मिरची सॉसमध्ये कोट करून घ्या. सिमला मिरची लांब कापून तळून घ्या. सोबत नूडल उकडून, गाळून थंड झाल्यावर तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा. चिकन कबाब डिशमध्ये रचून त्यावर सॉस घाला आणि सिमला मिरची आणि नूडल्सने सजवा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अंजली तळपदे, मुंबई