गाजर संत्री
साहित्य : १/२ किलो गाजर, प्रत्येकी १ वाटी साखर आणि दूध, २ वाट्या तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा वेलचीपूड, २ वाट्या पाणी.
कृती : गाजर धुऊन किसून घ्या. किसलेल्या गाजरात पाणी घालून ढवळा. गाजराचा किस पिळून घ्या, पाणी बाजूला ठेवा. एका कढईत गाजराचा किस, साखर, दूध घालून मिश्रण सुकेपर्यंत परता. त्यात वेलचीपूड घाला. आता दोन वाट्या गाजरपाणी उकळत ठेवा. त्यात तांदळाचे पीठ घालून उकड काढून छान मळून घ्या. उकडीचे छोटे गोळे करून पारी तयार करा. त्यात गाजराचे सारण भरून संत्र्यासारखा गोल आकार द्या. तयार संत्री मोदकपात्रात ठेवून वाफवून घ्या.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अभिलाषा उपाध्याय, पुणे