जांभूळ हलवा
साहित्य: १/४ किलो पिकलेली जांभळे, १/२ कप आरारूट, १ कप खडीसाखरेची पावडर, २ मोठे चमचे तूप, १/४ कप नट्स चिरलेले (बदाम, काजू, पिस्ते) १/४ कप भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, मगज बिया, तीळ, चीया सीड्स, जवस, १ १/२ कप पाणी.
कृती: जांभळे अर्धा कप पाण्यात टाकून पाच मिनिटे शिजवून घ्या. जांभळाच्या बिया काढून मिक्सरमधून वाटून घ्या. हा गर गाळणीने गाळून त्यात पाणी घाला. त्यात आरारूटची पावडर घालून एकजीव करून घ्या. एका ट्रेला तुपाचा हात फिरवून घ्या. नट्स आणि सीड्स गरम करून नट्सचे मोठे काप करा. तूप लावलेल्या ट्रेमध्ये थोडे सीड्स पसरून घ्या. गॅसवर जाड बुडाच्या भांड्यात एक कप साखर, पाव कप पाणी घाला. साखर विरघळून एक तार येईपर्यंत ढवळा. त्यात जांभूळ व आरारूटचे मिश्रण ओतून एकसारखे हलवत राहा, तळाला लागणार नाही, याची काळजी घ्या. हे मिश्रण घट्ट होत आले, की त्यात एक मोठा चमचा तूप घाला. दोन मिनिटे हलवून उरलेले तूप घाला. मिश्रण भांड्यापासून सुटू लागेल. त्यात निम्मे सीड्स व नट्स घालून मिश्रण ट्रेमध्ये ओतून थापून घ्या. उरलेले नट्स घालून दोन तासांनी त्याच्या वड्या कापा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
लता ओसवाल, कोल्हापूर