सोया वेगन केक
साहित्य: ३/४ कप सोया ग्रॅन्युल्स, ३/४ कप बारीक रवा, ३/४ कप पिठीसाखर, चिमूटभर मीठ, १/४ कप तेल, १ मोठा चमचा कोको पावडर, १ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, १ छोटा चमचा व्हिनेगर, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, १/४ छोटा चमचा बेकिंग सोडा, १/२ कप पाणी, प्रत्येकी १ छोटा चमचा कलिंगडाच्या बिया, काजूचे तुकडे.
कृती: सोया ग्रॅन्युल्स मिक्सरमधून बारीक करून घ्या. एक ते दीड कप पाण्यात हे भिजवून त्याला दोन मिनिटे उकळी काढा. गॅस बंद करून त्यात थंड पाणी घालून दोन वेळा धुऊन घ्या. या मिश्रणात रवा, पिठीसाखर, मीठ, कोको, तेल व थोडे पाणी घालून एकजीव करा. मिश्रण असेच ठेवून दहा मिनिटांनंतर त्यात थोड्या कलिंगडाच्या बिया व काजूचे तुकडे, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून एकत्र करा. त्यात व्हिनेगर घालून परत ढवळा. या मिश्रणात पाणी घालून सैलसर ढवळून एकत्र करून घ्या. तयार बॅटर केक मोल्डमध्ये ओता. शिल्लक ठेवलेले काजूचे तुकडे, कलिंगडाच्या बिया यांनी वरून सजावट करा. गॅसवर जाड बुडाची कढई ठेवा. त्यात एक स्टॅण्ड ठेवा. कढई दहा मिनिटे प्रीहिट करा. त्यावर केकटिन ठेवा. हा केक साधारण ४०-५० मिनिटे बेक करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मेधा कुळकर्णी, मुंबई