ग्रिल्ड उंदियो कंद
साहित्य: २ उकडलेली रताळी, बटाटे, अळकुड्या, १/२ सुरण, १ कोनफळ (जांभळा कंद), १ वाटी (१०० ग्रॅम) खोवलेला नारळ, ५० ग्रॅम कोथिंबीर, ५० ग्रॅम लसूण पात, ४ हिरव्या मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा धणे-जिरे पूड, १/२ छोटा चमचा ओवा, १/२ छोटा चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, २ छोटे चमचे लिंबूरस, २ छोटे चमचे डाळीचे पीठ.
सलाडचे साहित्य: पाव तुकडा कोबी, १ गाजर, १/२ छोटा चमचा मोहरीचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, १ छोटा चमचा चिलीफ्लेक्स, १/२ छोटा चमचा लिंबूरस.
चटणीचे साहित्य: दोन आलुबुखार, चवीनुसार काळे मीठ, १/४ छोटा चमचा जिरे, एक छोटा चमचा साखर.
कृती: सर्व कंद वाफवून साले काढून घ्या. खोवलेला नारळ, मिरची, कोथिंबीर, लसूण, लसूण पात, मीठ घालून मिक्सरमधून चटणी वाटून घ्या.चटणीमध्ये एक चमचा तेल, धणे-जिरेपूड, क्रश करून कसुरी मेथी, डाळीचे भाजलेले पीठ घाला. एक छोटा चमचा लिंबूरस, अर्धा छोटा चमचा साखर घालून एकजीव करा. वाफवलेल्या कंदांना हे मिश्रण लावून १५-२० मिनिटे ठेवून द्या. ग्रिल्ड पॅनवर तेल सोडून कंद शेकवून घ्या. हे कंद स्टिकमध्ये घालून त्याला स्मोक द्या. चटणीचे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्या. सलाडसाठी कोबी, गाजर उभे चिरून घ्या. त्यात ऑलिव्ह तेल, मीठ, साखर, चिलीफ्लेक्स, लिंबूरस घाला. तयार ग्रिल्ड उंदियो कंद चटणी आणि सलाडसोबत सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
वर्षा दोभाडा, पुणे