ग्रिल्ड अननस चिमीचुरी चिकन
मॅरिनेशनचे साहित्य: ४ बोनलेस चिकन ब्रेस्ट, १ कप अननसाचा रस, ४-५ किसलेल्या लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा चिलीफ्लेक्स, चवीनुसार मीठ.
चिमीचुरी सॉसचे साहित्य: १/४ छोटा चमचा मिरपूड, १ कप कोथिंबीर, ३-४ लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा ऑरिगॅनो, १ छोटा चमचा चिलीफ्लेक्स, १/४ कप ऑलिव्ह ऑइल, २ छोटे चमचे लिंबूरस, चवीनुसार मीठ.
सर्व्हिंगसाठी: चवीनुसार लाल तिखट, मीठ, ऑलिव्ह ऑइल, लिंबूरस लावलेले अननसाचे ग्रिल्ड केलेले तुकडे.
कृती : एका भांड्यात अननसाचा रस, लसूण, जिरे, चिलीफ्लेक्स, मीठ आणि मिरपूड एकत्र करा. या मिश्रणात चिकन घालून किमान अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवा. ग्रिलमध्ये मध्यम आचेवर चिकन ग्रिल करून घ्या. फूड प्रोसेसरमध्ये कोथिंबीर, लसूण, ऑरिगॅनो, चिलीफ्लेक्स, ऑलिव्ह ऑइल, लिंबूरस, मीठ आणि मिरपूड घालून चिमीचुरी सॉस तयार करा. चिमीचुरी सॉस जाडसर वाटून घ्या. ग्रिल्ड चिकनवर चिमीचुरी सॉस लावा. हे चिकन ग्रिल्ड अननसाच्या कापांसोबत सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
तेहजीब जमादार, बेळगाव