Fox Nut Chocolate Bar | Makhana Chocolate Bar | Granola Bars

मखाणा चॉकलेट ग्रॅनोला बार | भाविका गोंधळी, टिटवाळा | Makhana Chocolate Granola Bar | Bhavika Gondhali, Titwala

मखाणा चॉकलेट ग्रॅनोला बार

साहित्य: २ कप मखाणा, ५ बदाम, ५ काजू, २ अक्रोड, २ मोठे चमचे खसखस, १ मोठा चमचा तीळ, १ मोठा चमचा अळशी (जवस), प्रत्येकी १ छोटा चमचा बडीशेप, सब्जा बी, तुळशी बी, १० पिकलेली उंबर फळे, /कप मध, प्रत्येकी /चमचा ज्येष्ठमध पावडर, सुंठ पावडर, १/कप चॉकलेटचा कीस, १ छोटा चमचा कोरफड, १ चमचा खोबरेल तेल.

सजावटीसाठी: थोडे तीळ व खसखस.

कृती: प्रथम सब्जा बी पाण्यात भिजत घाला. पॅनमध्ये मखाणा हलकासा भाजून बाजूला काढून ठेवा. त्याच पॅनमध्ये काजू, बदाम, अक्रोडचे तुकडे घालून मंद आचेवर भाजून बाजूला काढून ठेवा. आता तीळ, खसखस, अळशी, बडीशेप, तुळशी बी हे सर्व जिन्नस भाजून थंड करून घ्या. मिक्सरमधून मखाणाची जाडसर पावडर करून घ्या आणि वरील मिश्रणात घाला. उंबर फळ व कोरफड रस पाणी न घालता वाटून घ्या. या मिश्रणात ज्येष्ठमध, सुंठ पावडर, सब्जा व मध घालून सर्व मिश्रण हलक्या हाताने एकजीव करा. त्यात उंबर-कोरफडची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करा. ग्रॅनोला सेट करण्यासाठी एका ट्रेवर बटर पेपर लावा. सर्व मिश्रण ट्रेमध्ये एकसारखे पसरा. सपाट बुडाच्या पेल्याने सर्व मिश्रण चांगले दाबून एकसारखे करा व नंतर फ्रिजमध्ये एक तास सेट होण्यासाठी ठेवा. छोट्या पातेल्यात अर्धा कप पाणी उकळायला ठेवा. पातेल्यावर बाउल ठेवा. बाऊलमध्ये चॉकलेट आणि खोबरेल तेल घालून सतत हलवत राहा. चॉकलेट वितळवून घ्या. आता ट्रे फ्रिजमधून काढा. वितळलेले चॉकलेट सम प्रमाणात ग्रॅनोलावर पसरा व त्यावर खसखस, तीळ भुरभरावे. ट्रे परत दीड तास फ्रिजमध्ये ठेवा. ट्रे फ्रिजमधून काढून पसरट ताटात डी-मोल्ड करा (उलटा करा). बटर पेपर काढा परत सरळ करून आवडीनुसार वड्या कापा.

टिप्स:- १. मखाणाऐवजी ओटस, पोहे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या लाह्या वापरून हा पदार्थ बनवू शकता.

२. उंबरऐवजी खजूरही वापरून ही डिश करता येईल.

३. चॉकलेट वितळवताना वरच्या भांड्याच्या तळाला पाणी लागणार नाही, याची काळजी घ्या.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


भाविका गोंधळी, टिटवाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.