साहित्यः १ कप उकडलेल्या बटाटयाचा लगदा अर्धा कप नारळाचे खोबरे अर्धा कप दूध २ कप साखर ७/८ वेलदोडे अर्धा चमचा सायट्रिक ॲसीड (लिंबाचे फूल) थोडेसे जायफळ थोडी जायपत्री अर्धी वाटी पिठीसाखर कृती: पिठीसाखरेखेरीज सर्व पदार्थ एकत्र करून गॅसवर ठेवावे. नंतर जरा घट्टसर झाले की वालाएवढे मिश्रण एका वाटीत पाणी घेऊन त्यात घालून पहावे. विरघळले […]
Blog
प्रबोधिनी एकादशी
चातुर्मासात आषाढी एकादशीपासून कार्तिक शुक्ल दशमीपर्यंत क्षीरसागरात शेषशय्येवर झोपी गेलेले भगवान विष्णू ह्या दिवशी हळूहळू जागे होतात. म्हणून ह्या एकादशीला प्रबोधिनी (देवऊठी) एकादशी असे खास नाव आहे. ह्या दिवशी भक्तमंडळी भजन, कीर्तन, गायन तसेच विविध वाद्यांचा गरज करतात. प्रथम मंत्रोच्चारांसह देवाचे आसन तसेच देऊळ फुलापानांनी, तोरणांनी सजवावे. देवाची पूजा करावी. प्रल्हाद, नारद, व्यास आदी भगवद्भक्तांचे […]
ग्लोबल जगात वागावं कसं?
ग्लोबल जगात जगणं,वागणं ही आपणा भारतीय(त्यात आपण मराठी आलोच) माणसांसाठी अगदी उस्फूर्त, सहजसाध्य अशी गोष्ट आहे. ‘ग्लोबल’ या शब्दामध्ये एकत्र आलेलं, एकमेकांशी जुळलेलं जग(Interconnected), एकमेकांवर अवलंबून असून (Interdependent), अंतिमत: ते एकरुप, एकात्म असं विश्व तयार होतं. तर आपल्याला संस्कृतीच्या उष:कालापासूनच कळलेलं आहे की, सारं विश्वमूळ एकाच चैतन्यापासून बनलेलं आहे. भोवतालचं विश्व म्हणजे त्या ‘एका’नं धारण […]
भाऊबीज
भाऊबीजेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीकडे म्हणजे यमीकडे जेवावयास गेले. यमीने त्याचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले. त्याला ओवाळले. त्या दिवसाची आठवण म्हणून ह्या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिथेच जेवावे अशी प्रथा आहे. ह्यावेळी बहिणीने भावाला ओवाळावे. भावाने ऐपतीप्रमाणे तिला ओवाळणी घालावी. बहिणीनेही भावाला एखादी भेटवस्तू द्यावी, जेवणात भावाच्या आवडीचे पदार्थ करावेत. सख्खी बहीण नसलेल्यांनी चुलत, […]
बलिप्रतिपदा
हिंदू पंचांगातील महत्त्वाच्या अशा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजे ‘बलिप्रतिपदा’ म्हणून ओळखली जाणारी ही तिथी होय. संपूर्ण भारतात ‘बलिप्रतिपदा’ सण म्हणून साजरी केली जाते. दिवाळीचा एक महत्त्वाचा दिवस असलेल्या बलिप्रतिपदेला आपण महाराष्ट्रात ‘दिवाळीचा पाडवा’ असे संबोधितो. विक्रम संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ह्या दिवशी सर्वांनी पहाटे अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत अशी पूर्वापार चालत […]
नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी दिवशी काय करावे? भल्या पहाटे सूर्योद्यापूर्वी सर्वांनी तिळाचे तेल, सुगंधी उटणे लावून (अभ्यंग) स्नान करावे. नवीन वस्त्रालंकार धारण करावेत. स्नानोत्तर देवपूजा करुन मग सर्व कुटुंबीयांनी एकत्रितपणे खास दिवाळीसाठी बनविलेल्या लाडू, करंज्या आदी पदार्थांचा आस्वाद घ्यावा. नरकचतुर्दशीपासून चार दिवस (भाऊबीजेपर्यंत) रोज अभ्यंगस्नान करावे. घराच्या दारात रांगोळी काढून पणत्या लावाव्यात. खिडकीत कंदील लावावा. शक्य असल्यास […]
लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन कसे करावे? दीपावलीच्या ह्या दुसऱ्या दिवशीदेखील पहाटे लवकर उठून तेल-उटण्याने अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. सकाळी देवपूजा, दुपारी पितरांचे श्राद्धविधी करुन प्रदोषकाळी पुन्हा स्नान करुन शुचिर्भूत व्हावे. नंतर पूजायोग्यस्थळी चौरंगावर अथवा पाटावर कुंकुम अक्षतांच्या साहाय्याने आठ पाकळ्यांचे कमळ काढून त्यावर लक्ष्मी, विष्णू, कुबेर ह्यांची पूजा करावी. त्या तिघांचीही मनोमन सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. नंतर त्यांना लवंग, वेलची, […]
धनत्रयोदशी
धनत्रयोदशी आज धनत्रयोदशी आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल-व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे ‘धनत्रयोदशी’ म्हटले जाते. धनत्रयोदशी या शब्दाचा अपभ्रंश ‘धनतेरस’ असा आहे. या दिवशी धनाची पूजा करण्याचा पूर्वापार परिपाठ आहे. याच दिवशी ‘यमदीपदान’ असाही एक शास्त्रार्थ दिलेला असतो’ यमाला या दिवशी दीपदान करावे, असे धर्मशास्त्राचे सांगणे असले तरी यमाला दीपदान कसे करणार […]
दिवाळीचे महत्त्व
आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत. सर्व प्रकारचा अंधार मागे टाकून उच्चल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगणारे आपण फार मोठी परंपरा आणि मोलाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या भारत देशाचे नागरिक आहोत. आपली दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी […]
वसुबारस
गाय आणि तिचे वासरु हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते ते केवळ अनुपमेय असे असते, तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते. दुसऱ्या कोणाला ते बधत नाही. ओळखत नाही. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात. नामदेवमहाराजांनी, तूं माझी माऊली, मी तुझें वासरुं । […]