Blog

नवरात्र : नटली ती रमणी

आज नवरात्रीचा सातवा दिवस. आज आपण श्रृंगारमयी अशा देवीचे स्तवन करणार आहोत. आपण शब्दफुलांची आरास मांडून नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीला वेगळ्या रूपात पाहत आहोत. तिचे स्तवन करून तिला विनम्र भावाने वंदन करीत आहोत. नवरात्रीनिमित्त हा शब्दोत्सव मांडलेला असल्यामुळे इथे श्रद्धेचा भाग आहेच, पण देवीकडे पाहण्याचा विविध स्वरूपांचा दृष्टिकोन रोज वेगवेगळ्या शब्दांत व्यक्त होत असल्यामुळे देवीची […]

नवरात्र : वज्रधारिणी

शारदीय नवरात्रीनिमित्त आपण सांप्रत प्रतिदिन देवीच्या विविध रूपांचे वेगवेगळ्या प्रकारांनी स्मरण करीत आहोत. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. ही सहावी माळ देवीच्या चरणी वाहताना आपण तिच्या वज्रधारिणी अशा पराक्रमी रूपाचे ध्यान करून तिला वंदन करणार आहोत. नवरात्रीनिमित्त जे काव्य आपण विवेचनासाठी घेतले आहे, त्या काव्याच्या रचनाकर्त्याला ज्योतिषाचे काही ज्ञान असावे, असे आधी म्हटले होते, त्याची […]

नवरात्र : प्रेमांकित जननी

आपण या वर्षीच्या नवरात्रात ज्या काव्याच्या आधारे नवरात्र उत्सव साजरा करीत आहोत त्या काव्याच्या कर्त्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान असावे, असे वाटते. कारण कुंडलीतील पंचमस्थान हे मुलांचे, संततीचे स्थान होय. पाचव्या दिवशी देवीचे स्मरण करताना कवीने तिच्या माता या स्वरूपावर अधिक भर दिला आहे आणि तो देताना तिचे आपल्या मुलांवर कसे प्रेम असते ते सांगितले आहे. […]

नवरात्र : नादमय सरस्वती

असे सांगतात की, या सृष्टीच्या प्रारंभी एक शब्द निर्माण झाला तो शब्द म्हणजे उकाराचा ध्वनी होय, असे आपण समजतो जगातील इतर ठिकाणी लोक आपआपल्या मतानुसार हा ध्वनी कोणता असेल याचे विविध अंदाज पूर्वापार वर्तवीत आलेले आहेत. एखादा मोकळा शंख कानाला लावला की त्यामधून ॐकाराचा ध्वनी उमटलेला ऐकू येतो. शंखात पाणी किंवा दुसरे काही भरलेले असेल […]

भोंडला – महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेसोबतच ‘भोंडला’ या खेळास सुरुवात होते. ‘भोंडला’ हा  प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो. या खेळात समवयस्क मुली एकत्र येतात. संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक आहे तसेच वर्षन शक्तीचे देखील! म्हणून एका पाटावर […]

नवरात्र : विश्वजननी

आज नवरात्रीचा तिसरा दिवस. त्रिगुणात्मक देवीच्या पराक्रमाच्या कथेचे वर्णन करणाऱ्या या तिसऱ्या दिवशी त्रिविध ताप हरण करणाऱ्या देवीच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. तृतीय दिनीं त्र्यक्षरा त्रिनयना त्रिगुण तापशमनी । तृतीय नेत्र उघडिला घालूनि दिव्यांजन नयनीं । प्रकाशमय तो प्रकाश झाला दिव्य दिसे गगनीं । नमन करुया प्रकाशरुपा प्रकाशदा जननी ।। देवी ही त्रिनेत्रा आहे. शिवशंकर […]

नवरात्र : जगदंबा

द्वितीय दिनीं तें द्वैंत सांडूनि एकच भवानीं । एकतानता एकच ध्याता एका एक मनीं ।। एका मनाने एकच होऊनि अंबेच्या चरणीं । नमन करुया द्वैतनाशिनी एकांबाजननी ।। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सर्व प्रकारचे द्वैत, दुजाभाव यांचा त्याग करून आपण सगळे एकच आहोत अशा एकविचाराने, एकत्वाने सर्व जगात समरसतेने सामावलेल्या देवीचे एकचित्ताने ध्यान करूया. द्वैताचा नाश करणाऱ्या जगदंबेचा भक्तिभावाने […]

नवरात्र प्रारंभ

आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. देवी नवरात्रीचा प्रारंभ आजच्या तिथीपासून होतो. घटस्थापना केली जाते. घटाच्या बाजूलाच पसरलेल्या थोड्याशा मातीवर धान्य रुजविले जाते. देवीच्या मूर्तीसमोर अथवा सप्तशतीच्या पोथीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. वेगवेगळे लोक आपापल्या प्रथा-परंपरांनुसार नवरात्र उत्सव साजरा करतात. नवरात्र हा सत्त्व-रज-तम अशा त्रिगुणविशेषात अवतरलेल्या महाकाली, महालक्ष्मी, आणि महासरस्वती अशा तीन देवतांच्या पराक्रमाचा गुणगौरव करणारा […]

वामन जयंती

दशावतारामधील वामन हा भगवंतांचा पाचवा अवतार आहे. भाद्रपद शुक्ल द्वादशीला ‘वामन जयंती’ म्हणून संबोधिले जाते. विष्णूभक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन. या विरोचनाला सूर्याने एक मुकुट दिला होता. त्या मुकुटाला दुसऱ्या कोणी स्पर्श केलाच तर त्यामुळे विरोचनाला मृत्यू येईल असा शाप होता. त्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंतानी स्त्री-रूप घेऊन त्याला आपल्या नादी लावले आणि संधी साधून त्याच्या मुकुटाला स्पर्श […]

नारळाच्या करंज्या

साहित्य : २ मोठे नारळ ३ वाटया साखर १०-१२ वेलदोडे थोडेसेच बेदाणे ३ वाटया बारीक रवा १ वाटी मैदा अर्धी वाटी डालडाचे मोहन तळण्यासाठी डालडा किंवा रिफाईंड तेल चवीपुरते मीठ पीठ भिजविण्यासाठी दूध कृती: रवा व मैदा एकत्र करुन त्यात मीठ घालावे. तूप (डालडा) पातळ करुन घ्यावे. हे मोहन गरम करुन पिठात घालणे. हे पीठ […]