गौरीपूजन एखादी उपासना किंवा एखादे व्रताचरण करताना त्यात देशपरत्वे किती विविधता येऊ शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौरीपूजन हे होय. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. काही भागात आणि काही समाजात ही गौरी म्हणजे कालीच समजून तिला ‘तिखटाचा’ म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो. आता गणपती घरात असतानाच गौरी […]
Blog
दूर्वामाहात्म्य
पूर्वी सर्व देवांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याच विनंतीवरून गणपतीने अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या अंगाची प्रचंड आग आग होऊ लागली. गणपतीने ताडले की, हा आपल्या उदरातील अग्नी त्रिभुवनही जाळून टाकील, म्हणून मग गणपतीला जाणवणारी तीव्र दाहकता शांत करण्यासाठी कोणी चंद्र, कोणी कमळ, कोणी पाणी अशा थंड उपचाराचा वर्षाव केला पण त्यांचा काहीच उपयोग होईना. तेव्हा ऐंशी […]
ऋषिपंचमीची भाजी | Rishi Panchami Vegetable Recipe
साहित्यः अळूची १ जुडी लाल भोपळयाचे मोठे तुकडे १ वाटी लाल माठाचे दांडे चिरून(एक मोठी दांडी), सुरणाचे मोठे तुकडे १ वाटी ३ किंवा ४ सफेद भेंडीचे दोन तुकडे घेवडयाचे तुकडे १ वाटी गवारचे तुकडे १ वाटी एक लांब पडवळ तुकडे केलेले एका शिराळ्याचे मोठे तुकडे ४ ते ५ आंबाडे एका मक्याचे तीन ते चार तुकडे […]
श्रीगणेश चतुर्थी | Ganesh Chaturthi
सुखकर्ता दु:खकर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ।। सर्वांगि सुंदर उटि शेंदूराची ।। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रें मन कामना पुरती ।। ही आरती आज महाराष्ट्रातल्या लाखो घरांतून प्रेमादराने आणि भक्तिभावाने म्हटली जाईल. आज होत असलेले मंगलमूर्तींचे आगमन विशेषच आनंदकारी आहे. ही आरती श्रीसमर्थ […]
पारंपारिक मोदक – कालनिर्णय स्वादिष्ट २०१७
पारंपारिक मोदक साहित्यः ३ वाटया तांदळाची पिठी २ चमचे तेल अर्धा चमचा मीठ. सारणासाठीः १ मोठा नारळ १ वाटी साखर किंवा गूळ १० वेलदोडयाची पूड आवडत असल्यास बेदाणे २ चमचे खसखस. पूर्वतयारीः नारळाचा चव, गूळ घालून चांगला शिजवणे. त्यात वेलदोडयांची पूड घालणे. तसेच बेदाणा, खसखस घालून चांगले ढवळणे व गार करण्यास ठेवणे. कालनिर्णय मंगलमूर्ती आरास(घरगुती) […]
हरितालिका
हरितालिका हे व्रत सवाष्णींच्याबरोबरच विधवा स्त्रियाही करतात. हे ह्या व्रताचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करीत आहोत – असा संकल्प करुन मग पूजा करावी. पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे. (सत्यनारायणाच्या पूजेच्यावेळी लावतात तसे-) केळीचे खांब चौरंगाच्या चारही बाजूंना लावून तो फुलांनी सजवावा. स्वतः व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्रे […]
पौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे (रस्सा व सुक्की)
साहित्य : ४ लाल कांदे(बारीक चिरून) २ (चहाचा)चमचा राई १ मोठा चमचा तेल ३ चिमुठ हळद व हिंग मीठ(चवीनुसार) २ (चहाचा)चमचा लाल मसाला १ (चहाचा)चमचा गरम मसाला पाव वाटी खसखस(बारीक वाटून) सुके खोबरे(किंचित भाजून बारीक वाटून) १ वाटी कोथिंबीर(बारीक चिरून) कृती: तीव्र आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करावे. राई तडतडल्यानंतर गँस मीडियम करा. त्यात […]
तांबुल बर्फी (विडयाच्या पानाची बर्फी)
साहित्य : ९ ते १० विडयाची पाने २ वाटी नारळाचा चव सव्वा वाटी साखर ३ चमचे पानाचा मसाला (बडीशेप, थंडाई (चिमुटभर) गुंजेचा पाला टुटीफ्रुटी गुलकंद खजुराचे काप सुक्या खोबऱ्याचा कीस मिल्क पावडर २ चमचे कृती : पानाची देठे व शीरा काढा. वाटलेली पाने, नारळाचा चव, साखर, २ चमचे मिल्क पावडर घालून मिक्सरमधून काढा. हे मिश्रण […]
दहिकाला
मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषत. कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपसवंगड्यांसह गायींना घेऊन बालकृष्ण रानावनात जात असे. त्यावेळी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या कालविल्या जात. (त्याला ‘काला’ म्हणतात.) कृष्णाला दही-! अतिप्रिय म्हणून ह्मा उत्सवात एका मडक्यात दही, दूध, लोणी […]
वसुदेवाचे भाग्य
श्रीएकनाथी भागवताच्या पाचव्या अध्यायात नारदांनी वसुदेवाकडे त्याच्या भाग्याचे वर्णन केले आहे. ती कथा शुक्राचार्य परिक्षित राजाला ऐकवीत आहेत. नारद वसुदेवाला म्हणाले, सकाळ भाग्यांचिया पंक्ती । जेथें ठाकल्या येती विश्रांती । ते वसुदेवा भाग्यस्थिती । तुझ्या घराप्रती, क्रीडत ॥ वसुदेव तुझेनि नांवें । देवातें ‘वासुदेव’ म्हणावें । तेणें नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे, निरसती दोष ॥ येवढया […]