१) अश्र्वत्थ-मारुती पूजन: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. […]
Blog
श्रावणी शुक्रवार – जरा-जिवंतिका पूजन
जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव […]
श्रावणी गुरुवार
श्रावणी गुरुवार ह्या दिवशी गुरुचरित्राचा पाठ करण्याची अनेक कुटुंबांत परंपरा आहे. ती श्रद्धेने पाळली जाते. सद्यःस्थिती : ज्यांना शक्य असेल त्यांनी आणि ज्यांची इच्छा असेल त्यांनी स्वत. हा पाठ करावा. शारीरिक व्याधी असल्यास सक्षम आणि शुद्ध आचार-विचार असलेल्या ब्राह्मणाकडून हा पाठ करवून घ्यावा. अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
बटाटयाची शेव
साहित्य : बटाटे, हिरव्या मिरच्या वाटलेल्या, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, तळण्यासाठी तेल, खाण्याचा पिवळा रंग. कृती : बटाटे स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये वाफवून गार करा. पुरणयंत्रातून वाटून घ्या. चवीनुसार हिरव्या मिरच्या वाटलेल्या, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, खाण्याचा पिवळा रंग मिसळा, खूप मळा. शेवपात्रातून शेव पाडा. तळा. टिप : ही शेव फारच कुरकुरीत व चवदार होते.
रव्याची खीर
साहित्य : बारीक रवा पाव वाटी, तूप १ चमचा, दूध २ वाटया पाणी अर्धी वाटी साखर ४ चमचे स्वादाकरता जायफळ-वेलची पूड केशर सुका मेवा मीठ कृती : तुपात रवा मंद आचेवर भाजा. थोडासा गुलाबी रंग आला की त्यात मीठ व पाणी घालून शिजू द्या. त्यात साखर, सुका मेवा, जायफळ-वेलची पूड घाला. केशर घाला. यानंतर दूध […]
नागपंचमी
गणपती हा शंकराचा पुत्र. शंकरापासून गणपतीने दोन गोष्टी उचलल्या. पहिला भालप्रदेशावरील चंद्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागांबद्दल प्रेम, आस्था. शंकराप्रमाणेच गणपतीला भालचंद्र असे म्हणतात. गणपतीच्या सुप्रसिद्ध बारा नावांत तिसरे नाव भालचंद्र असे आहे. गणपतीने नाग हा आभूषण म्हणून धरण केला आहे. तर शंकराने हलाहल प्राशन केल्यानंतर त्याच्या कंठाचा म्हणजे गळयाचा दाह होऊ लागला. त्या दाहाने […]
श्रावणी बुधवार : बुध- बृहस्पती व्रत
श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. ह्या व्रताची कथा अशी- एका राजाला सात सुना होत्या. त्याच्या दारात रोज एक मामा आणि भाचा भिक्षेसाठी येत. पण त्यापैकी […]
श्रावणी मंगळवार व मंगळागौरीची कथा
श्रावणी मंगळवार : श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवारी परिचितांपैकी कोणाकडे तरी मंगळागौर असतेच. नुकत्याच लग्न झालेल्या मुलीने हे व्रत करावयाचे असते. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी माहेरी आणि नंतरची चार किंवा सहा वर्षे सासरी मंगळागौर जागविली जाते. सोयीनुसार पाच किंवा सात वर्षे हे व्रत केले जाते. ह्या व्रतात सोळा प्रकारची पाने आणि सोळा दिवे पूजेसाठी लागतात. शिवाय पाटा-वरवंटा […]
श्रावणमास व शिवमुष्टी व्रत : श्रावणी सोमवार
१. शिवमुष्टी व्रत (शिवामूठ) : लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ,तीळ,मूग,जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम […]
दीपपूजा
अमाव्रत : आषाढ महिन्याच्या अमावास्येला ‘हरिता’ किंवा ‘हरियाली अमा’ असे संबोधतात. व्रतकर्त्याने एकांत असलेल्या पाणथळ जागी जाऊन स्नान करावे. ब्राह्मणाला भोजन घालावे असे दोन प्रमुख विधी ह्या व्रतात सांगितले आहेत. ह्या व्रतकार्यामुळे ‘पितर’ प्रसन्न होतात- हेच त्याचे फल आहे. (ह्या दिवशी काही देवळांमध्ये पूजा बाधली जाते. तसेच स्त्रिया झोपाळ्यावर बसून आनंदाने गाणी म्हणतात.) सद्यःस्थिती : […]