Blog

लोकमान्य

गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावे, काय करावे, याचा नीट उलगडा होण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवितो तो गुरु. म्हणूनच लोकमान्य टिळकांना राष्ट्रगुरू असे यथार्थतेने म्हणता येते. पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच!’ असे तेजस्वी उद्गार काढले आणि या टिळकांच्या उद्गारांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. राष्ट्रगुरु टिळकांनी भारतीयांना हा जणू […]

सावता माळी आणि बालरुपी पांडुरंग

माळियाचे वंशी, सांवता जन्मला । पावन तो केला । वंश त्याचा ॥ त्याजसवें हरी, खुरपूं लागे अंगी । धांवूनी त्याच्यामागें । काम करी ॥ पीतांबर कास, खोवोनी माघारी । सर्व काम करी । निज अंगे ॥ एका जनार्दनीं, सांवता तो धन्य । तयाचें महिमान । न कळे कांही ॥ सावता माळी हे ज्ञानदेव, नामदेव यांचे […]

संत नामदेव व ग्रंथसाहेब

शिंपियाचे कुळीं जन्म माझा झाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं ॥ रात्रिमाजि शिवीं दिवसामाजि शिवीं । आराणूक जीवीं नाहीं माझ्या ॥ सुई आणि सातुळी कात्री गज दोरा । मांडिला पसारा सदाशिवीं ॥ नामा म्हणे शीवीं विठोबाचे अंगीं । त्याचेनि मी जगीं धन्य झालों ॥ संत नामदेवांचा जन्म शिंप्याच्या घरात झाला आणि आता तर नामदेव शिंपी […]

डॉ. संजय देशमुख | कालनिर्णय | जुलै २०१७ | मुंबई विद्यापीठ |

शिक्षणाच्या नव्या दिशा

अनेक प्रगत देशातल्या विविध शिक्षणव्यवस्था आणि त्यांच्या सर्वोत्तमतेचा मला काहीसा अनुभव आहे. मात्र माझे निकटचे नाते भारतीय शिक्षणव्यवस्थेशी आहे. मी केवळ मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी नाही; तर या मातृसंस्थेत शिक्षक होण्याचे आणि आता या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचे भाग्यही मला लाभले आहे. शिकण्याची प्रक्रिया ही शेवटच्या श्र्वासापर्यंत सतत सुरूच असते. आजचे जग हे कालच्यासारखे कधीच नसते, हे […]

माझ्या यशाचे रहस्य

एकाग्रता म्हणजे संपूर्ण चित्त एकाच विषयावर केंद्रित करून, त्यात प्रावीण्य आणि यश मिळविणे होय. हा विषय कधी प्रत्यक्ष नजरेला दिसणारा असेल तर कधी कल्पनेतला! एखाद्या कल्पनेतला वास्तवात आणून तिला मूर्त स्वरूप देण्यासाठी शरीरातील स्नायूनस्नायू आणि मनातील विचारनविचार त्या गोष्टीवर केंद्रित होणे आवश्यक आहे. माझ्या मते एकाग्रतेची ही ढोबळ व्याख्या आहे. ऋषी आणि महर्षींना ध्यानधारणा करताना […]

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा व गुरु-शिष्य परंपरा | Guru Purnima

गुरुपौर्णिमा व गुरु-शिष्य परंपरा ह्या दिवशी महर्षी व्यासांनी पृथ्वीवर जन्म घेतला अशी आपल्या धुरिणांची श्रद्धा आहे. त्यामुळे संन्याशी मंडळी ह्या दिवशी व्यासांची पूजा करतात. त्यासाठी स्नानादी नित्यकर्मानंतर संकल्पपूर्वक एक सुती धूतवस्त्र अंथरतात. त्याच्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा काढतात. हेच व्यासपीठ! मग त्यावर ब्रह्मा, विष्णू, वसिष्ठ, पराशर, शक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, […]

‘तटस्थ’ तें ध्यान, विटेवरी !

तुकोबांनी विटेवरचे विठ्ठलाचे ते रूप सुंदर भासले, मनाला भावले आणि तुकोबा म्हणून गेले, सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । पण मुळात तुकोबांना विठ्ठलाचे हे ध्यान सुंदर वाटण्याचे एक कारण म्हणजे ते ध्यान स्थिर आहे, शांत आहे. ते विटेवर स्थिरपणे उभे आहे. ते हालत-डुलत नाही. ते निश्र्चल आहे. विटेवरच्या दोन पायांपैकी एक पाय मध्येच वर घेत […]

राजगीरीच्या पिठाच्या पुऱ्या | कालनिर्णय पाकनिर्णय २०१७

राजगिरा पिठाच्या पुऱ्या

साहित्य: पाव किलो राजगिरीचे पीठ २ मोठे बटाटे (उकडलेले) ४-५ हिरव्या मिरच्या मीठ पाणी कृती: तयार राजगिरीच्या पिठात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २  उकडलेले बटाटे व चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. मळताना थोडा पाण्याचा हात लावून पीठ मळावे. नेहमीच्या पुऱ्यांप्रमाणे या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. बटाट्याच्या भाजीबरोबर अथवा गोड दह्याबरोबर या पुऱ्या खाण्यास द्याव्यात. […]

गंधर्वनाम संवत्सरे - पु. ल. देशपांडे

गंधर्वनाम संवत्सरे …

या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्यांच्या लेखी काहीही असलं तरीमराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे बालगंधर्वनामे संवत्सरच आहे. बालगंधर्व नावाचा या महाराष्ट्राच्या नाट्यकला क्षेत्रात जो एक चमत्कार घडला, त्या विस्मयकारक नटवराच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत उत्तम दर्जाचं कार्य करणाऱ्यांना श्रेष्ठत्व मिळतं, लोकप्रियता मिळतं. पण विभूतिमत्त्व लाभतंच असं नाही. ही कुणी कोणाला उचलून […]

नियतीलाही मदत लागते | व.पु. काळे

नियतीलाही मदत लागते

काही काही माणसं जन्माला येतानाच ‘ सुखी माणसाचा ‘ वॉश अँड वेअर सदरा घालून येतात. ‘ वॉश अँड वेअर ‘ असं म्हणायचं, पण या थोर लोकांनाही गरज पडणार नाही असे यांचे योग. किंवा तशी गरज पडलीच तर लाँड्रीचे दुकान यांच्या इमारतीत तळमजल्यावर असतं. वरच्या मजल्यावरून नुसत्या टाळ्या वाजवल्या तरी या महाभागांना एकदम ‘ तव्यावरची पोळी […]