गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावे, काय करावे, याचा नीट उलगडा होण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवितो तो गुरु. म्हणूनच लोकमान्य टिळकांना राष्ट्रगुरू असे यथार्थतेने म्हणता येते. पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच!’ असे तेजस्वी उद्गार काढले आणि या टिळकांच्या उद्गारांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. राष्ट्रगुरु टिळकांनी भारतीयांना हा जणू […]
