स्त्रियांचे योगदान तेव्हा पाळण्यातसुद्धा मुलींची लग्ने व्हायची. मुलगी दहा- अकरा वर्षांच्या वयात कुमारिका असली की ती घोडनवरीच समजली जायची. मुलींची वये लहान; नवरे मात्र तिशी-चाळिशीचे किंवा कधी साठी-पासष्टीचेही द्वितीय, तृतीय वर असायचे. अवघ्या बाराव्या-तेराव्या वर्षी विधवा होऊन जन्मभर हालअपेष्टा सोसणाऱ्या मुलींची संख्या कमी नव्हती. त्या काळात वरच्या समजल्या जाणाऱ्या वर्गांत विधवांना वपनाची सक्ती होती. त्यांनी […]
