डिमसम | rice dimsum

भाताचे देसी डिमसम | अर्चना चौधरी, पुणे | Desi rice dimsum | Archana Chaudhary, Pune

भाताचे देसी डिमसम

आवरणासाठी साहित्य॒: १/२ कप शिजवलेल्या भाताची पेस्ट, २ मोठे चमचे बारीक रवा, २ मोठे चमचे तांदूळ पिठी, १/४ चमचा मीठ, चिमूटभर काश्मिरी लाल तिखट.

सारणासाठी साहित्य॒: १०० ग्रॅम चिकन खिमा, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा तिखट, चिमूटभर हळद, १/२ चमचा चिकन मसाला, १ चमचा तेल, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी कांद्याची पात, पुदिना चटणी.

कृती॒: शिजवलेल्या भाताची पेस्ट, रवा, तांदूळ पीठ, मीठ, तिखट एका ताटात घेऊन छान एकत्र करून घ्या. या गोळ्याला तेलाचा हात लावून अर्धा तास झाकून ठेवा. चिकन खिमा बनविण्यासाठी तेलात कांदा, आले-लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या. आता यात तिखट, हळद, चिकन मसाला घाला. मीठ घालून दहा मिनिटे झाकून मंदाग्नीवर शिजवा. खिमा शिजल्यावर एका भांड्यात काढून ठेवा. आता भाताच्या गोळ्यांचे सहा सारखे गोल बनवा. त्या गोळ्यांमध्ये चिकनचा खिमा भरून व्यवस्थित बंद करून घ्या. टूथपिकच्या साह्याने आकार देऊन डिमसम बनवून घ्या. हे डिमसम वीस ते पंचवीस मिनिटे वाफवून घ्या. हेल्दी देसी डिमसम तयार आहेत. गरम गरम असतानाच कांद्याच्या पातीने सजवून पुदिना चटणीसोबत सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अर्चना चौधरी, पुणे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.