फणसाच्या आठळ्यांचे मूस
मूससाठी साहित्य : १/२ कप फणसाच्या उकडलेल्या आठळ्या, १०-१२ फणसाच्या गऱ्यांची प्युरी, १ कप व्हिप्ड् क्रीम, १/४ कप कन्डेन्स्ड् मिल्क, २ मोठे चमचे जिलेटीन, पिस्ता, २ मोठे चमचे पाणी.
कृती : मूस बनविण्यासाठी व्हिप्ड् क्रीम, कन्डेन्स्ड् मिल्क, उकडलेल्या आठळ्यांची पेस्ट यांचे मिश्रण तयार करून घ्या. यातील थोडे मिश्रण बाजूला काढून त्यात गऱ्यांची प्युरी मिक्स करा. जिलेटीन पाण्यात भिजत ठेवा. नंतर भांड्यात गरम करून वितळवून घ्या. वितळलेले जिलेटीन दोन्ही मूस मिश्रणात ओता. मोल्डमध्ये प्रथम पांढरा, त्यानंतर गऱ्याचे पिवळे मिश्रण घालून फ्रीजमध्ये चार-पाच तास सेट करण्यासाठी ठेवा.
बेससाठी साहित्य : ८ ते १० भाजलेल्या बदामाची पूड, २ मोठे चमचे आठळ्याची पावडर, २ लहान चमचे पिठीसाखर, २ चमचे वितळलेले बटर.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून बिस्किटच्या आकारात गोल करून थापून घ्या व फ्रीजमध्ये ठेवा.
फ्रूट मोती : १/२ कप गऱ्यांचा ज्यूस, २ चमचे गूळ पावडर, १/४ कप पाणी, १ मोठा चमचा जिलेटीन पॅनमध्ये एकत्र करून उकळी आणा. हे मिश्रण घट्ट झाल्यावर थंड तेलात ड्रॉपरने ज्यूसचे दोन ड्रॉप टाका. फ्रूटचे मोती तयार होतील. सर्व्ह करताना बेसवर मूस ठेवा, फ्रूट मोती, पिस्त्याचे काप, व्हिप्ड् क्रीम यांनी गार्निश करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मिताली नरे
Very Nice mitali ..wish to prepare it at home too ..
Very Nice mitali ..wish to prepare it at home too ..Ajun Kai banavata yeul sang mala ..